धन्य मायबोली

Submitted by चैतन्य रामसेवक on 7 August, 2019 - 05:14

धन्य मायबोली तुझ्या दारी आलो
हसू की रडू संशयात पार बुडालो
ड्यु आयड्यांची तर्हा ही न्यारी
आपण आपणा म्हणती हे ज्ञानी
थोपटून पाठ आपणच आपली
काढून हे धागे एका आयडीने
शाबासिती लेखका दुजा आयडीने
चैतन्य म्हणे आम्ही नसू दुधखुळे
हसे येई आम्हा देखता हे चाळे
धन्य मायबोली तुझ्या दारी आलो
बघून हे ढोंग आज धन्य झालो ॥

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

????

¿¿¿¿