मी बहुरुपी

Submitted by चैतन्य रामसेवक on 7 August, 2019 - 03:45

मी तर बहुरुपी आहे
कधी कुठे कधी कसा
अवतरतो धरुन रुप नवे
कधी दिसे कधी अदृष्य होत असे
मला शोधण्याचे कुणा लागले पिसे
मी असतो इथे मी असतो तिथे
मला लपण्या जागा नाही कुठे
अवतीभवती वावरतो मी
चाहूलही न लागे कुणाला
रूप बदलतो क्षणा क्षणाला
मज धरू जाता येतो ना हाता
कधी तोळा कधी मासा
कधी शहाणा कधी खुळा
कधी सरळ तर कधी वाकडा
असा मी बहुरंगी बहुढंगी
मी तर बहुरुपी आहे

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

असे म्हणणे म्हणजे कविता कळली नाही. कविता ही कविता असते. मुर्खासारखे संबंध जोडणे तुमच्या सारखे लोकच करु शकतात.

मी आता लॉग आऊट करायला आलो होतो. पण आक्कूनी अक्कल पाजळलेली दिसली. म्हणून चालू झालो. चला बाय बाय.