खास कविता

Submitted by Asu on 5 August, 2019 - 10:58

खास कविता

श्रावणमास मातीस सुवास
त्यात दरवळे भज्यांचा वास
म्हटलं मस्त बैठक मारून
लिहावी एक कविता खास

कागद घेतले, घेतली लेखणी
उदबत्तीने केली बैठक देखणी
बसून झाले चार पाच तास
एकाही ओळीचा होईना विकास

कॉफीची एक किक मारली
मेंदूला मी भीकही मागली
मेंदू असा ढिम्म रुसला
वाटलं आज प्रयोग फसला

म्हटलं कविता गेली उडत!
तिच्यावाचून नाही अडत
कविता मग रडू रडू झाली
आणि मुकाट शरण आली

अश्रूंच्या ओळी टप टप खाली
त्यांचीच खास कविता झाली
जगाने एक आश्चर्य पाहिले
कागद लेखणीही बघतच राहिले

प्रा.अरूण सु. पाटील (असु)
(दि.05.08.2019)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

कविता मस्तच!!
श्रावणमास
मातीस सुवास
त्यात दरवळे
भज्यांचा वास
>>>
असे आहे खरे पण श्रावणीसोमवार आज
त्यात माझा उपवास Happy