बहकीसी बारीश ने फीर...

Submitted by 'सिद्धि' on 5 August, 2019 - 03:00

हिरवाई चा शालू लेउनी ही धरा उभी आहे स्वागतासाठी. झाडा, फुला-पानांवरती, घरावरती, छपरावरती अन मनावरती येणारी मभळ बाजुला सारुन सैरभैर पळणार्या ढगांचा लपंडाव सुरु झाला आहे. कडक उन्हाचा दाह शमवण्यासाठी कातर वेळेस नभ उतरु लागले आहेत. अशा वेळी रातकिड्यांची किर्र आणि काजव्यांची सोनेरी रांगोळी सळसळणार्या गवताच्या पात्यामध्ये नवलाईचे स्मित घेउन आली आहे. मदनाचे चाप जणू असे ईन्द्रधणू नभी उमटले आहे. चींब भीजूनही चमचमणारे ऊन म्हणजेच नव चैतन्याचा जन्म झाला आहे. कारण ऋतुचे सोहळे घेऊन आता माझा श्रावण आला आहे . सौदामीनीचा लखलकाट, मेघांचा कडकडाट, तृप्तीचे घन, मातीचा सुगंध आणि वार्याची मंजूळ शीळ अशा मंगलमय आणि आनंदी वातावरणात श्रावणाचे आगमन झाले आहे.
"जागुनि ज्याची वाट पाहिली, ते सुख आले दारी
जिथे तिथे राधेला भेटे, आता श्याम मुरारी
माझ्याही ओठांवर आले नाव तुझेच उदारा !
श्रावणात घन निळा बरसला."

कुठे या नर्तक मोराने आपला स्वाभीमानी पिसारा फुलवला आहे. तर कुठे माझ्या कृष्णाने त्याच्या मुरलीचा सुर लावला आहे. कारण आता श्रावण आला आहे. त्या चातकाला जाउनी सांगा कुणीतरी आखेरीस तुझा श्रावण आला आहे.
हा ऋतु असा आहे की कोणाला तरी चींब भीजावस वाटते. तर कोणाला तरी छत्रीतुन भीजताना पहावस वाटत. तर कधी इंद्रधणू च्या रंगा मध्ये रंगुन जाव अस वाटत. पाऊसात वार्यावर फड-फडणारा विहंग होऊन कधी उंच झाडाच्या फांदीवर बसुन ऐटीत झुलावस वाटत. त्या नभीचे चुंबन घेउन कधी खळाळणारर्या सरीते मध्ये थेट बुडाव अस देखील वाटत. "अशाच पावसात कधी मनसोक्त भीजलो सोबतीस घेऊन कोणा"... अशा आठवणी सुद्धा या श्रावणातच बहरतात.

बहकीसी बारीशने फीर
यादोंकी गठरी खुलवाई,
मीले चन्द लम्हे घायल
और ढेर सी रुसवाई !!

कुछ सुनेसे सन्नाटे थे
और ख्वाहीशें दबी दबी
यूँ रखें थे कुछ अरमान
छोड़ा हो जैसे अभी अभी
चद्दर सी उम्मीद मीली
कई जगह थी सील्वाई
मीले चन्द लम्हे घायल
और ढेर सी रुसवाई !!

हर सीलवट मे ग्ठरीके
बुनेबुनाये ख्वाब मीले
भीगी चांदनी रातोंके
महकेसे महताब मीले
सीमटीसी खुदहीमे और
इक तहजीब नजर आयी,
मीले चन्द लम्हे घायल
और ढेर सी रुसवाई !!

बहकीसी बारीशने फीर अशा कितीतरी नव्या-जुन्या,चांगल्या-वाईट आठवणींना जागे केलेले असते.
" लहानपणी ओढा ओलांडताना बाबांनी पकडलेला हात असो, किवा लपुनछपुन पावसात भीजुन, घरी आल्यावर पाठीवर पडलेला आईचा हात असो. कुण्या जीवलगाचा हातात हात धरुन तासनतास भीजने असो, कधी अशाच पावसात सवंगड्यांच्या हाताची साखळी करुन केलेली मज्जा असो. " प्रत्येकाच्या मनाच्या कोपर्यात पावसाची अशी एक तरी वेगळी आठवण असते.
" नवी नाती, नव्या रिती याच पावसाच्या साक्षीने जुळतात. वाट हरवलेली पाखरे याच पावसात पुन्हा मिळतात, रुसलेले-फसलेले क्षण आपसुकच बहरतात, बहराची धुंदी घेऊन तरुवरा प्रमाने लहरतात. कधीही न जुळलेले बंध याच पावसात सलत राहतात, कुण्यातरी वेड्याच्या गालावर आठवणींचे थेंब ढळत असतात."
WhatsApp Image 2019-08-05 at 12.20.56 PM.jpeg .
कधीतरी... अश्याच पावसाच्या अगणीत थेंबाना आपल्या हाताच्या ओंजळीत धरु पाहणार माझ मन दुरवर कुठे तरी पोहोचलेल असत. आणि अश्याच कधी काळच्या भीजलेल्या आठवणींना शोधुन-शोधुन मोजत बसलेल असत. मग वेळ कसा नीघुन जातो काहीच कळत नाही. पाऊस मात्र परतीच्या प्रवासाला निघाला आहे हे मन मानत नाही. मध्येच केव्हा लक्षात येत ! "अरे पावसात भीजायच होत, राना-वनांत भटकायच होत, वाफाळता चहा आणि गरमा-गरम भजीचा स्वाद घेत गप्पा गोष्टींत रमायच होत. हे जमल नाही तरी अजुन थोड नहायच बाकी आहे, थोडस बागडायच बाकी आहे, थोड अजुन उंदडायच बाकी आहे, थोडसच धडपडुन मग थोडसच रडायच बाकी आहे, पाऊस असताना."

यातले काही जमले नाही, तर गुरू ठाकूर म्हणतात तस,
"झरे मेघ आभाळी तेव्हा, क्षणभर आपुले वय विसरावे.
नाव कागदी घेउन हाती, खुशाल डबक्यात रमावे."

आणि हे सुद्धा नाहीच जमले तर, "व्याकुळ अशी नक्षत्रे कोरडीच जाती,भीजण्याच्या आशेवरती कोमेजुन गेल्या राती" अस म्हणण्याची वेळ येईल एवढ मात्र नक्की.

(लेखनातील अपेक्षीत दुरुस्ती नक्की सुचवा.)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Chan..