डागडूजी

Submitted by स्वर on 9 April, 2009 - 12:57

असंख्य खेळ झाले जरी
रिता राहीला मंच
आज पुन्हा मांडला मी
आठवणींचा प्रपंच

बीजे पेरली प्रयत्नांची
रिकामीच माझी झोळी
कोणा एकाने लिहील्या भाळी
असफलतेच्याच ओळी

पुन्हा नव्याने खुणवे आज
नव्या गावची नवी वेस
सज्ज झालो मी ही पुन्हा
धारुन नवा वेष

"प्रयत्न करीन हो...."
लढण्या नवी बाजी
कुठे मिळेल करुन पण
फाटक्या नशिबाची डागडूजी?

गुलमोहर: 

स्वर, कविता छान आहे. कवितेचा अर्थ देखील छान आहे.
................................................................................................................
आठवणींच्या देशात मी मनाला कधी पाठवत नाही, जाताना ते खुष असत पण येताना त्याला येववत नाही

आशयपूर्ण. आवडली.
..सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो..

Happy छान.

स्वर मस्तच!आवडली

डागडुजीला वावच नाही इतकी सुंदर कविता आहे.

फाटक्या नशिबाची डागडूजी?
- अहाहा

प्रयत्नांना नशीबाची साथ हवीच. कदाचित हेच सुत्र या कवितेत ओवले आहे.

आवडली Happy
************
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची | झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ||

खूप आवडली!!!

========================
बस एवढंच!!

खरंय. डागडूजीला वावच नाही ! छान.