निसर्गाच्या गप्पा (भाग ३४)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 3 August, 2019 - 06:51

" कोसळताना वर्षा अविरत
स्नानसमाधी मध्ये डुबावे
दवांत भिजल्या प्राजक्तापरि
ओल्या शरदामधी निथळावे |
हेमंताचा ओढुन शेला
हळूच ओले अंग टिपावे
वसंतातले फुलाफुलांचे
छापिल उंची पातळ ल्यावे |
ग्रीष्माची नाजूक टोपली
उदवावा कचभार तिच्यावर
गर्द वीजेचा मत्त केवडा
तिरकस माळावा वेणीवर |"

कवयित्री इंदिरा संत यांनी 'सरकते ऋतु आणि त्या सोबत बहरणारा निसर्ग' अचुक पणे दर्शवणारे सुंदर वर्णन केल आहे. आपल्याला देखील काहीस असच वाटत असत ना ? " कोसळणार्या पावसामध्ये तल्लीन होउन चिंब भीजत रहाव, अगदी समाधी घेतल्यावर जी एकाग्रता असते त्या एकाग्रतेने स्नान करावे. मग निथळण्यासाठी सोनेरी शरदाच्या उन्हात उभे रहावे. जणू दवांत भीजलेला प्राजक्त निथळण्यासाठी शरदाचे कोवळी ऊन झेलत आहे. हेमंताचा रेशमी-उबदार शेला अंगावर ओढावा पण वस्त्र मात्र वसंतात बहरणार्या रंगी बिरंगी, सुवासिक फुला-पानांनी गुंफलेले असावे. सोबत ग्रिष्माच्या चकाकी सारखी रंगीत चोळी घालावी. आता या बरोबरच साज म्हणून गर्द विजेची माळ अगदी केवड्या प्रमाने सहज वेणीवर माळुन ऋतु सोहळ्यासाठी सज्ज असावे."
किती सुंदर भाव | अगदी तरल.

"नितळ निळाई आकाशाची अन क्षितिजाची लाली,
दवात भिजल्या वाटेवरती किरणांची रांगोळी.
पानांमाधली सळसळ हिरवी अन किलबिल पक्षांची,
झुळझुळ पाणी वेळूमधुनी उडे शिळ वाऱ्याची.
कोठेही जा अवती भवती निसर्ग एकच आहे.
हे जीवन सुंदर आहे."
विधात्याने आपल्याला दिलेली अमुल्य देणगी म्हणजे निसर्ग. याने आपले जीवन अधिक सुंदर झाले आहे.काळ, वेळ, ठिकाण,देश,हवामान यानुसार बदलतात ती निसर्गाची रुप. पण खरच जगाच्या पाठीवर कोठेही गेल तरीही निसर्ग एकच आहे. याला ठरावीक सिमारेषा नाही. देश नाही. धर्म, प्रांत, जात-पात काही लागू पडत नाही.
" गोठ्यातील गाई पासुन ते डबक्यातील बेडका पर्यंत, आणि गर्वाने पिसारा फुलवुन नृत्य करणार्या मयुरा पासुन ते भिरभीर करत कुंपण काठीवरती बसणार्या चतूरा पर्यंत, सगळीकडे त्याची किमया आहे. निळसर पांढ-या निसुर्डी पासून ते गोलाकार, जाळीदार थेंबांनी भरुन फुलणार्या दवबिंदू पर्यंत सगळीकडे तोची किमयागार."

पहाटेच्या वाऱ्याकडुन
थोडीशी चंचलता घ्यावी,
कोवळ्या त्या किरणांकडुन
थोडीशी कोमलता घ्यावी,
उमलत्या फुलाकडुन
नाजुकशी सुंदरता घ्यावी
थंड मंद हवेला कसं
नाजुक स्पर्शाने जाणावे.
निर्मात्याच्या अविष्काराने
धुंद होउन जावे.

निसर्गा कडून काय काय घ्यायचे याच कवी ईथे सुंदर वर्णन करतात. चंचलता, कोमलता आणि सुंदरता घेऊन धुंद होऊ पाहताना निसर्ग प्रेमींनी ही गोष्ट देखील लक्षात ठेवली पाहिजे की निसर्गातील प्रत्येक गोष्टीचा आनंद आपण घेतला पाहिजेच, पण त्या बरोबरच पुढील पिढी साठी हा नैसर्गिक ठेवा जतन, संवर्धन आणि संरक्षण करणे हि काळाची गरज आहे तसेच आपली नैतिक जबाबदारी देखील आहे.

मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच कोकण या प्रत्येक विभागाने आपल्याला भरभरून नैसर्गिक विविधता बहाल केली आहे. कास पठारावर असणारे विविध प्रकारचे पक्षी व प्राणी, कामशेत, माळशेज सारखे वैविध्यतेने नटलेले घाट, अलिबाग, दापोली, मुरुड पासून रत्नागिरी पर्यंत पसरलेले समुद्र किनारे आणि त्या लगत असणारे जलदुर्ग, महाबळेश्वर, पाचगणी सारखी थंड हवेची ठिकाणे, बुलढाण्यातील खार्या पाण्याचे लोणार सरोवर, निघोज चे रांजणखळगे, महाराजांच्या काळातील अनेक गड, किल्ले असा भरभरून मिळणारा निसर्ग कोणाला पहायला आवडणार नाही! गर्द झाडी आणि उंचसखल डोंगराळ भाग, हिरवी गार शेत, अवखळ वाहणारी नदी, खळाळून हसणारे झरे, मोजेत वेळू मधून शीळ घालणारा वारा, किलबिलाट करणारे विहंग आणि पाण्यावरील जलतरंग कोणाला पहायला आवडणार नाही! पण आजच्या काळात वेळे अभावी म्हणा किंवा शहरीकरणाचा वाढता वेग म्हणा, अशा काही कारणांमुळे आपल्याला या सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात राहण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. काहीजण फक्त बागेत जाऊन ते सुख अनुभवत असतात तर काहींच्या नशिबी ते ही नाही. अशाच निसर्गप्रेमी मंडळींना जुन्या-नवीन नैसर्गिक सौंदर्याची ओळख आणि देवाणघेवाण पुढे कायम ठेवण्यासाठी हा प्रेमळ धागा चालू आहे.

(वरील मनोगत नि.ग. प्रेमी सिद्धी या मायबोली आयडीने दिले आहे.)

1564837557-picsay.jpg

(फोटो मायबोली आयडी शाली यांच्याकडून साभार)

आला आषाढ-श्रावण

आल्या पावसाच्या सरी

किती चातकचोचीने

प्यावा वर्षा‌ऋतू तरी!

पावसाळ्यात बा सी मर्ढेकरांच्या ह्या ओळींचे स्मरण होत नसेल असा मनुष्य विरळाच. वर्षाऋतूत तृप्त न्हाऊन निघालेल्या धरणीने आता हिरवाकंच शालू नेसला आहे. सगळीकडे दिसणाऱ्या हिरव्या रंगाच्या नाना छटा आता नेत्रसुखद गारवा देतायेत. आषाढात गर्जत पडणाऱ्या पावसाने सगळीकडे वातावरण कुंद करून सोडले आहे. बळीराजा सुखावला आहे. आता श्रावणाचे दमदार आगमन ... पंचमीपासून सणासुदींना सुरुवात. मनुष्य हा मूळचा निसर्ग पूजक त्यात आपण भारतीयांनी आपल्या सर्व सणसभारंभात निसर्गातील प्रत्येक घटकाला यथोचित सामावून घेतलंय. आपल्या हिंदूसंस्कृतीत निरनिराळ्या पूजा आणि पूजेत वापरल्या जाणा-या पानाफुलांना विशेष महत्व आहे. श्रावणातली सगळी व्रतवैकल्य निसर्गाच्या समीप घेऊन जाणारी, निसर्ग अनुभवायला,जपायला शिकवणारी. या निसर्गाच्या गप्पांच्या ३४ व्या धाग्यावर सर्व नि ग करांचे मनपूर्वक स्वागत. हा निसर्गाच्या गप्पांचा धागा सर्वांसाठी निखळ आनंदी, ताण दूर करणारा, नवनवीन माहिती आणि अनुभवाची देवाणघेवाण करणारा आणि सर्वांगाने बहरणारा ठरो असे निसर्गदेवतेला आवाहन.

(वरील मनोगत नि.ग. प्रेमी ऋतूराज या मायबोली आयडी यांचे आहे)

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825 (भाग ३२)https://www.maayboli.com/node/63032 (भाग 33)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शालीदा, ते माथेरानचे आहेत फोटो. फिरताना सहज दिसले.
सारंगखेड्याच्या यात्रेतल्या कोटी कोटीच्या अश्व बाजाराबद्दल ऐकून आहे, पण गेलो नाही कधी.

मस्त आहे रुई. नालासोपा-यात जागोजागी असायची ही, श्रीरामपुरला पांढरी रुई जागोजागी ज्याला मांदार म्हणतात. ज्यात गणपतीबाप्पाचा वास असतो म्हणतात.

डोंबिवलीत आम्ही लहान असताना खूप नाही पण कुठे कुठे दिसायची. आई अकरा पानांचा हार करुन शनीवारी मारुतीला घालायची.

बाकी फोटो पण मस्त. घोड्यांचा खासच.

किट्टू २१, रुईचा फोटो छान.
Tiger जातीची फुलपाखरे ह्यावर अंडी घालतात
पण हीच चीक डोळ्यात गेल्यास फार वाईट.

हो वर्षा फोटो दिसतोय. सातभाई आहे का ???
@ ऋतुराज, रूईची पाने औषधी असतात असं ऐकलं आहे. चिकाबद्दल माहिती नव्हतं.

वर्षाताई
माहीत नाही पण Tawny bellied babbler गुगलून पहा बरे.

रूईची पाने औषधी असतात असं ऐकलं आहे.------- हो रुईची पाने, मूळ, चीक खूप औषधी आहे पण तितकीच विषारी देखील, त्यामुळे याचा वापर अनुभवी वैद्यांच्या सांगण्यावरूनच करावा

सातभाई फार उग्र दिसतो आणि मोठा असतो. हा रॉबीन असावा. फार गोड आणि चंचल पक्षी.
हा फोटो दिसतोय वर्षा.

रुई मस्तच. फार भावना गुंतल्यात रुईत. तिचे गुण माहीत नाहीत.

रुईच्या फुलांचं आणखी एक वैशिष्ट्य असतं. फुलातला सर्वात मधला पंचकोनी भाग दिसती आहे, त्या पंचकोनाच्या प्रत्येक कोनावर त्या फुलांची परागपिशवी असते. बारीक टाचणीने ती काढून पाहता येते. ही पिशवी पखालीसारखी असते. म्हणजे दोन पिशव्यांची तोंडे एकत्र जोडलेली असतात. फुलावर कीटक बसला की त्याच्या पायात हा जोड अडकतो आणि त्याच्याबरोबर त्या परागपिशव्या एकही परागकण खाली न सांडता दुसऱ्या फुलावर पडतात. यशस्वी परागणाचं मॉडेल!!

अगदी बरोब्बर अदीजो
आणि ह्या पराग पिशव्या त्या कीटकाला नीट दिसाव्यात यासाठी पाकळ्यांच्या वर पाच उभ्या महिरपी सारखी रचना असते Corona

रुईच्या पानांची रचना देखील खूप वैशिष्ट्यपूर्ण असते
दोन जोडया समोरासमोर आणि दुसरी जोडी 90 अंशात समोरासमोर opposite decussate
यामुळे सर्व पानांना योग्य सूर्यप्रकाश मिळतो
याच धर्तीवर जपान मध्ये उंच इमारतीतील प्रत्येक खोल्यांची रचना केलेली आढळते

प्रेमा तुझा रंग कसा
IMG_20190817_215903.JPG

चारचौघी
IMG_20190817_215712.JPG

कित्ती नाजूक
IMG_20190817_215643.JPG

गुलाबाची कली बघा हलदीनं माखली
IMG_20190817_215559.JPG

वा वा मनिम्याऊ
चारचौघी मस्तच
अगदी प्रसन्न केला कट्टा

सातभाई, रॉबीन आणि Tawny bellied babbler...हं.
Tawny bellied babbler फोटो बघितले गूगलवर पण कन्फ्यूज व्हायला झालेय
सातभाईचे इंग्लिश नाव काय?
आणि रॉबिन नसावा बहुतेक.

हा खालचा फोटो दिसतोय का?
हा कोणता पक्षी आहे? स्थळः कामशेत >>> माझ्या एका पक्षीतज्ञ मित्राला विचारले.... त्याच्या सांगण्यानुसार तो इंडियन राॅबिन आहे... Happy

हिरवाई
हिरवी वाट
Vaat.jpg

कुसुम्ब ची कुसंबी रंगाची पालवी पाहिलीत आता ही पण पहा
Kusum.jpg

पायरी ची पालवी Ficus arnottiana (Indian Rock Fig)
बरेचदा पिंपळ आणि पायर यात फसगत होते. पिंपळाच्या पानाच्या कडा सरळ असतात तर पायर च्या नागमोड्या wavy margin . तसेच पायरी च्या पानाचा देठ आणि शिरा लालगुलाबी असतात.

Payar.jpg

गुळवेलीची फळे

Gulvel.jpg

आहा हा! भारीच फोटो ऋतूराज.
मला वाटले पिंपळच आहे. खडकाच्या बॅकग्राऊंडवर काय सुरेख दिसतायेत ती पाने. मस्तच.

Water lily with Square shaped geometry
IMG_20190818_155128.JPG

या एकाच फ़ुलाचा आकार चौकोनी आहे. बाकी सारी फ़ुले नेहमीसारखी गोलाकार आहेत

याचवेळा पाहिजमस्त माहिती अदिजो.
ऋतुराज फोटो आणि माहिती मस्तच. हे असे खोटे पिंपळ ब-याचवेळा पाहिलेत पिंपळाच समजून.
मनिम्याऊ सगळे प्रचि सुरेख.

Pages