आशेचा किरण

Submitted by Asu on 2 August, 2019 - 12:36

आशेचा किरण

अंधारल्या दिशा सगळ्या
काळोख जगती दाटला
वादळ वारा तुफान सुटला
भरदिवसा सूर्य झाकोळला

भरकटल्या वाटा भोवती
प्रकाशही कुठे लपला ?
मनातल्या कोपऱ्यात पण
आशेचा किरण दिसला

प्रयत्नांचा दीपक सदैव
मनात असू दे तेवता
तारिल तुज संकटसमयी
तोच असे तव देवता

सूर्य नसू दे तुझ्या संगती
सांभाळ दिवा मनातला
माणसुकीचा स्नेह देऊनी
पसरो प्रकाश किरणातला

प्रा.अरूण सु. पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

Group content visibility: 
Use group defaults