देव!

Submitted by उमेश कोठीकर on 9 April, 2009 - 05:57

अब्ज अब्ज तार्‍यांतूनी तू
वसुंधरा ही फुलवितो
शब्द शब्द गीता बनूनी
कर्म अमुचे जागवितो!

तु फुलांची नि मुलांची
वाटिका ही फुलवितो
कष्ट,बळ,धैर्य्,सुख
सर्व आम्हा शिकवितो

प्रार्थनेपूर्वीच प्रभू तू
बालकांना रक्षयितो
तिमीरकवचा फोडूनि तू
सुखसूर्या जन्म देतो

पाकळ्यांना गंध देतो
नयनांना बाण देतो
तू भुकेला अन्न देतो
या कुडीला प्राण देतो

अधर्म हा उन्मत्त होता
साक्षात! पृथ्वीवर तू येतो
प्रेम वायू बनूनी राहो
मुरलीचा संदेश देतो!

तू दयाळा! योनीमुक्त
मोक्ष आम्हा दान देतो
तरी मूढ आम्ही; "मी'च्या
"संचिताचे "गान गातो!!

गुलमोहर: 

शेवटी कर्ता करविता तोच आहे. छान.

देवावर श्रद्धा असलि कि भावना अश सुन्दर होउन अलगद कवितेच रुप घेतात..प्रत्येक कविते सारखि हि पन अप्रतिम..

प्रार्थनेपूर्वीच प्रभू तू
बालकांना रक्षयितो
उमेशजी फार सुन्दर !

खरच देव खुप दयावन्त आहे.................छान भाव............

सुहास शिन्दे

देवाचे आभार आतापर्यंत सगळं दिल्याबद्द्ल आणी उमेशजींच्या कविता वाचायला मिळतात म्हणुन Happy

खुप छान !

सुमेधा पुनकर Happy
**************************************
पतंग्यानेच का जावं आगीजवळ ?
ज्योतीला सांग, नमन कर ना एकदा
**************************************

अधर्म हा उन्मत्त होता
साक्षात! पृथ्वीवर तू येतो
प्रेम वायू बनूनी राहो
मुरलीचा संदेश देतो!

आवडले.
संपन्न कविता.
..सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो..

उमेश, सुंदर! Happy

अब्द चा अर्थ मलाही समजला नाही.
बाकी कविता मस्तच.

शरद
.............................
"तुजसारखे कवी जे येतात रोज 'खावर'
बसतात गप्प सारे कोलाहलात इथल्या!"
............................

दक्षिणा,शरद; अब्द चा अर्थ ईथे सेवक असा अभिप्रेत आहे.जो की इस्लामिक शब्दकोषाप्रमाणे आहे.अब्दुल्लाह ;अब्द उ अल्लाह म्हणजे ईश्वराचा सेवक. ग्रीक भाषेत अब्द चा अर्थ शब्द असा आहे.मराठीत हा शब्द मीना प्रभूंच्या म्हणण्यानुसार फक्त मर्ढेकरांनी वापरलेला दिसतो;
किती पायी लागू तुझ्या
किती आठवू गा तूते
किती शब्द बनवू गा
अब्द अब्द मनी येते
तरी काही नवीन अर्थ किंवा दुरुस्ती असेल तर कृपया सांगा.

उमेश, इतका गूढ अर्थ नको द्यायला. सिंपल 'अब्ज अब्ज' असा प्रयोग तार्‍यांच्या संख्येवरून दिला तरी कवितेचं सौंदर्य कमी मुळीच होणार नाही.
-मुकुंद कर्णिक
मुकुंदगान:- http://mukundgaan.blogspot.com

मुकुंदजी,तुमचे म्हणणे पटले.बदल करतो. धन्यवाद.

मि अब्ज अब्जच वाचले होते; आत्ता कळतेय ते अब्द अब्द होते. आशय कळला की शब्दांच्या टायपोला महत्व राहत नाही ते असे!
..सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो..

...! Happy