प्राजक्त

Submitted by Asu on 31 July, 2019 - 01:08

प्राजक्त

शुभ्र अंगी केसर रंगी
प्राजक्त फुलला पानोपानी
धुंद फुंद गंध पसरला
श्रावण हसला रानोरानी

शापित अप्सरा नभातुनी
अवतरल्या का भूवरती
नाजूक नाजूक सुंदर बाला
श्रावणमासी दरवळती

उमलताच गळून पडावे
अगम्य ऐसी दैवगती
प्राजक्ताचा सडा सांडला
वनराणीची बैठक ती!

आयुष्य तुझे क्षणभर जरी
वेड लाविते जन सकला
रूप रंग तव गंध जपतो
मम हृदयी प्राजक्त फुला

प्रा.अरूण सु. पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

Group content visibility: 
Use group defaults

छान

छान कविता..

आजकाल प्राजक्त शहरांच्या जुन्या भागातूनही दुर्मिळ व्हायला लागलाय Sad पण जिथे कुठे असेल तिथून तो असल्याची ग्वाही रोज संध्याकाळी अगदी 50 मीटर अंतरावरूनही मिळते...