प्रगतीचा हव्यास

Submitted by Asu on 26 July, 2019 - 06:03

प्रगतीचा हव्यास

हव्यास प्रगतीचा नडतो
ग्लोबल वॉर्मिंग चहूकडे
हिमालये सागरास मिळती
प्रलयाचे घुमती बोल खडे

जमीन घटली नगरे वाढली
पाऊस पाणी जिरेल कुठे
घरादारात शिरते पाणी
प्रलयाचे घुमती बोल खडे

नद्या नाले तुडुंब भरले
पाणीच पाणी चोहीकडे
गुरेढोरे माणसे बुडाली
प्रलयाचे घुमती बोल खडे

माणसे मरती उजाड धरती
आकांडतांडव चोहीकडे
प्रगतीच्या हव्यासापोटी
प्रलयाचे घुमती बोल खडे

राज्याच्या हव्यासासाठी
कौरव-पांडव सैन्य लढले
कोण वाचले काय मिळाले
प्रलयाचे घुमती बोल खडे

मानवा तुझ्या लढण्यापायी
नृशंस हा नरसंहार घडे
सांभाळ जरा, ऐक पुढे
प्रलयाचे घुमती बोल खडे

प्रा.अरूण सु. पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

Group content visibility: 
Use group defaults

सुंदर!! Happy

प्रगतीच्या वाटेवर चालताना,
मानव करतो आहे
निसर्गासोबत स्वतःची हानी
कळत आहे तयास
पण वळत मात्र नाही.