सहस्त्र लाईक

Submitted by Asu on 23 July, 2019 - 13:28

माझ्या कवितांवर भरभरून प्रेम करणाऱ्या रसिकांमुळे माझ्या ‘असुच्या कविता’ या एफ बी पेजचे आज एक हजार लाईक्स झाले. त्यानिमित्त प्रेमपूर्वक-

*सहस्त्र लाईक*

प्रथम नमितो गणरायाला
नंतर वंदन रसिकजनाला
सहस्त्र लाईक आज जाहले
'असुच्या कविता' पेजला

प्रेमाच्या एकेक थेंबासाठी
चातक मी करीन प्रतीक्षा
मेघ होऊन तुम्ही बरसला
पूर्ण झाली मनीची आशा

कविता माझी तुम्हां भावली
देईन तुम्हां उन्हात सावली
जगण्याचा ती मार्ग दाविल
दीपस्तंभ सदा तुम्हां होईल

रसिकजनहो तुमच्यासाठी
शब्दांचे मी बांधीन इमले
निमंत्रण रसिका तुमच्यासाठी
स्वागत करण्या सगळे सजले

विश्वास तुमचा श्वास झाला
कौतुकाचा मजला थाळा
होऊन आपण सर्व गोळा
कवितेचा करू स्वाद सोहळा

रसिका तुजविण शब्दखेळ
काव्यप्रतिभा गमे वायफळ
सदैव असू दे तव हात पाठी
कविता माझी तुझ्याच साठी

मधाचे पोळे होईल मन्मन
मध कवितेचा मी सदा देईन
फुकट नव्हे पण घेईन दाम
प्रेमाचा वसूल करीन छदाम

प्रा.अरूण सु. पाटील (असु)
(दि.23.07.2019)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults