ब्लॅकमेल

Submitted by स्वाती पोतनीस on 23 July, 2019 - 02:42

सौ स्वाती पोतनीस

ब्लॅकमेल

रात्रीची वेळ. धोधो पाऊस कोसऴत होता. वेङयावाकङया सरी तावदानावर आपटत होत्या. एक खिङकी उघङली जाऊन जोरात आपटली आणी सीमाला जाग आली. ती खिङकी ब़द करायला गेली. तिचे लक्ष समोर गेले. तो अजूनही खाबाला टेकून उभा होता. त्याची नजर तिच्या खिङकीवर होती. तेवढयात वीज चमकली. दोघाची नजरानजर झाली. त्याने नजर दुसरीकडे वळवली नाही. भलताच धीट झाला होता तो. गेले दोन दिवस तो तिला बऱ्याच ठिकाणी दिसला होता. सिमा घाबरली. सहा फूट उच, अगापेराने मजबूत. काळासावळा, उलटे वळवलेले केस आणी नाकाचा शेडा काहीसा वाकडा. यामुळे तो उग्र दिसत होता. तशी ती भित्री नव्हती. पण आज ती घरात एकटीच होती. शशाक दोन दिवस झाले कामानिमीत्त गावाला गेला होता. तिने भराभर दारे खिडक्या बंद असल्याची खात्री करून घेतली आणि निवांत झोपयला गेली.
सकाळी उठल्यावर प्रथम ती खिडकीपाशी गेली आणि पडद्याआडून खाली डोकाऊ लागली. तो तिथे नव्हता. निश्चिंत मनाने तिने सर्व आवरले आणि ती ऑफिसला गेली. दिवसभराच्या कामात ती कालचा प्रसंग विसरून गेली. आज ती सुरभिबरोबर खरेदीला जाणार होती. तिला सुरभि जिना चढताना दिसली. “कुठे जाऊ या ग?” “ए मला भूक लागली आहे तेव्हा आधी काहीतरी खाऊन मग FCला खरेदीला जाऊया.” त्या खाली आल्या तसे पहारेकऱ्याने तिच्या हातात एक पाकीट ठेवले. तिने पाकीट उघडले. आत एक चिठ्ठी होती. त्यात दोनच शब्द होते ‘उद्या भेट’. ती बुचकळ्यात पडली. खाली नाव नव्हते.
“काय ग सीमा, काय प्रकार आहे हा?”
“माहित नाही ग. जाऊ देत चल आपण जाऊया.”
FC रस्त्यावर खरेदी करून त्या वाडेश्वरमध्ये शिरल्या. नऊ वाजले तसे ती म्हणाली, “सुरभि चल लवकर. तुला घरी सोडते अन मी जाते.”
“जाशील ग. एवढी काय घाई आहे. किती दिवसांनी भेटतोय आपण. आणि शशांकही नाहीयेना, मग थांबलीस तर कुठे बिघडणार आहे”.
“ठीक आहे. दहा मिनिटे थांबून मग जाऊया.”
सुरभिला सोडून ती घरी पोहोचली तेव्हा अकरा वाजून गेले होते. रस्त्यावर शुकशुकाट होता. ती बंगल्याचे दार उघडून आत गेली तशी तिला “त्या”ची आठवण आली आणि तिला घरात शिरायाचीही भीती वाटायला लागली. तिने मनाचा हिय्या केला आणि कुलुपाला किल्ली लावणार तोच दाराला फक्त कडी असल्याचे तिच्या लक्षात आले. मनातल्या मनात कामवाल्या बाईना शिव्या देत ती आत शिरली. दिव्याचे बटन चालू करून ती वळली तोच दारावरची घंटा वाजली. तशी ती दचकून किंचाळली. बाहेरून शशांकचा आवाज आला. “सीमा, मी आहे शशांक. काय झाले का ओरडलीस?”
त्याचा आवाज ऐकून तिने पटकन दार उघडले. समोर तो खांबापाशी उभा होता. शशांकला मात्र तिने काही सांगीतले नाही.
“अरे तू आज कसा काय आलास? उद्या येणार होतास न?”
“काम झाले लवकर म्हणून आलो.”
“शशांक अरे आज बाई बहुतेक दाराला कुलुप लावायला विसरल्या.”
“दाराचे कुलुप तर मी काढले. तुला येताना पाहून गाडीमागे लपलो होतो. काय पण तू लगेच घाबरलीस.”
सीमा आतल्या खोलीत गेली. तिने दिवा लावला. खिडकीच्या फटीत एक चिठठी अडकवलेली होती. तिने चिठठी उघडली. त्यावर एका टेकडीचे चित्र होते. चार पाच झाडे काढलेली होती. मधून जाणारी पाऊलवाट आणि मावळतीचा सूर्य. तिने चिठ्ठी पटकन कपाटात लपवली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ऑफिस मधून निघताना तिला तिच्या स्कुटीवर परत एक चिठ्ठी अडकवलेली दिसली. यावेळेस आधीचेच चित्र असून टेकडीवर एक मुलगा व मुलगी बसलेले दाखवले होते. ऑफिसच्या समोर रस्त्यापलीकडे तो उभा होता. तिचे त्याच्याकडे लक्ष जाताच तो छद्मी हसला. तिने आता सोक्षमोक्ष लावायचा ठरवला. ती रस्ता ओलांडायला लागली. पण गर्दीमुळे तिला पलीकडे जायला वेळ लागला. ती काय करतीय हे त्याच्या लक्षात आल्याबरोबर तो घाईघाईने निघून जायला लागला. ती रस्ता ओलांडून जाईपर्यंत तो गर्दीत मिसळून गेला. तिने ताबडतोब तिच्या एका मैत्रिणीला फोन लावला. “क्रांती मी एका संकटात सापडलीय. मला तुझी मदत हवीय”.
पलीकडून एक भारदस्त आवाज आला. “क्रांती नाहीये. पण तुम्ही माझ्याशी बोलू शकता. मी अजिंक्य पै. तिचा सहकारी.”
“ओहो. तिने मला तुमच्याबद्दल सांगितले होते. मी भेटायला केव्हा येऊ शकते?”
“पहिल्याप्रथम मला तुमचे नाव सांगा. आणि काम खूपच महत्त्वाचे असेल तर तुम्हीं आत्तासुद्धा येऊ शकता.” “मी सीमा करमरकर. क्रांतीची शाळेतली मैत्रीण. मी आत्ताच येते. माझे महत्त्वाचे काम आहे. मला जरा पत्ता सांगता का?”
“अजिंक्य पै, २२ पै व्हिला, प्रभात रोड, गल्ली क्रमांक ६, पुणे ४”
पै व्हीला तीन मजली दगडी बंगला होता. बंगल्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुंदर फुलझाडे लावलेली होती. बंगल्याच्या आवारात एक जिप्सी उभी होती. सीमा पायऱ्या चढून वर गेली. बंगल्याचे मुख्य दार लावलेले होते. उजव्या बाजुला एका दारावर ऑफीस अशी पाटी होती. ती आत शिरली. समोरच मोठे काचेचे टेबल होते. पलीकडे खुर्चीवर एक देखणा तरूण बसला होता. आवाजाप्रमाणेच त्याचे व्यक्तिमत्वही भारदस्त होते. घारे डोळे, सरळ नाक आणि पिळदार शरीरयष्टी डोळ्यात भरत होती. तिला पाहताच तो उठून उभा राहिला. त्याची उंची जवळजवळ सहा फूट असावी. आपल्याशी फोनवर बोललेला तरूण हाच असावा अशी तिची खात्री पटली.
“मी सीमा करमरकर.”
“या. बसा.” त्याने पाण्याचा पेला पुढे केला. पाणी पिऊन सीमाने त्याच्यापुढे चिठ्ठ्या ठेवल्या. काही न बोलता त्याने सर्व चिठ्ठ्या वाचल्या. “या चिठ्ठ्यांवर तुम्हीं नंबर टाकले आहेत म्हणजे त्याच क्रमाने तुम्हाला त्या मिळाल्या असणार. कुठे आणि कधी मिळाल्या?” सीमाने सर्व घटना सविस्तर घडल्या तशा सांगितल्या.
“मी या व्यक्तीला शोधावे अशी तुमची अपेक्षा आहे का?”
“हो” “ही व्यक्ती कोण असावी असे तुम्हाला वाटते? म्हणजे तुमच्या पूर्वायुश्याशी काही संबंध?”
“त्या व्यक्तीला मी कधी पाहिलेले नाही. परंतु त्या चित्रांचा माझ्या पूर्वायुश्याशी संबंध आहे.” यानंतर तिने सांगितलेली माहिती अशी. सीमाच्या वडिलांचा कारखाना होता. तिथे राहुल नावाचा अभियंता कामाला होता. सीमाने व राहुलने लग्न ठरविले होते. परंतु सीमाच्या वडीलांना ते मान्य नव्हते. कारण कारखान्याच्या व्यवहारात त्याने केलेली अफरातफर त्यांच्या लक्षात आली होती. त्यांनी राहुलचा अपमान करून त्याला नोकरीवरून काढून टाकले. त्या वेळेस जाताना तो सीमाला धमकावून गेला होता , “या अपमानाचा बदला तर घेईनच पण तुलाही आयुष्यात कधी सुखी होऊ देणार नाही.” चिठ्ठीमधल्या चित्रात दाखवलेली टेकडी हे त्यांचे नेहमीचे भेटायचे ठिकाण होते याबद्दल सीमाला खात्री होती.
शशांकचे वडील हे सीमाच्या वडिलांचे मित्र होते. त्यांनी शशांकसाठी सीमाला मागणी घातली. त्यावेळेस शशांक परदेशात नोकरी करत होता. त्याने भारतात बदली करून घेतली. आता त्यांचा सुखी संसार चालु असताना मधेच हे संकट ओढवले होते.
ही माहिती सीमाने सांगितल्यावर अजिंक्य काहीवेळ विचार करत होता. “या सर्व प्रकाराबद्दल तुम्हीं शशांकला काही कल्पना दिली होती का?”
“नाही. एक तर त्या गोष्टीला जवळजवळ एक वर्ष उलटून गेले होते, त्यानंतर राहुल कधीही भेटला नाही. त्याच्या घरी जाऊन बाबांनी खात्री करून घेतली होती. त्यामुळे तो पुणे सोडून गेला असावा असा आम्ही अंदाज बांधला.”
“हं. म्हणजे हे तो स्वतः करीत असण्याची शक्यता कमी असली तरी पूर्णपणे नाकारताही येणार नाही.”
“तुमच्याकडे राहुलचा फोटो आहे का?”
“नाही. पण बाबांच्या ऑफिसमध्ये फाईलमध्ये नक्की मिळेल.”
“मग उद्याच मला मोबाईलवर फोटो पाठवून द्या.”
“चालेल.”
...
क्रांतीचा फोन वाजला. शशांकचा, तिची मैत्रीण सीमाच्या पतीचा फोन होता. “बोल शशांक. माझी कशी काय आठवण झाली?” “क्रांती मला आत्ता भेटू शकतेस का? महत्वाचे काम आहे.” शशांक मी आत्ता पुण्यालाच येतीय. बोल न. काय झाले आहे. सीमा ठीक आहे न?” “हो. ती ठीक आहे. पण एक प्रॉब्लेम झाला आहे.”
“बोल शशांक. संकोच न करता सांग.”
“मला एक माणूस ब्लॅकमेल करतोय. तुला सीमाच्या राहुल बरोबरच्या अफ़ेअरबद्दल माहित आहे का?” “हो. पण ते प्रकरण केव्हाच संपले आहे.”
“मला त्या माणसाकडून मला या गोष्टी समजल्या. तो माझ्या वडिलांना व वर्तमानपत्रात याबद्दल कळवेन असे म्हणत होता. तसे झाले तर तिच्या वडिलांचीही खूप नाचक्की होईल. तसेच माझ्या वडिलांनाही मी काय उत्तर देऊ? तेही घराण्याच्या नावाला फार जपतात. मला सीमाला याबाबत कळू द्यायचे नव्हते. ती माझ्याशी प्रामाणिक आहे याची मला खात्री आहे. मी त्याला आत्तापर्यंत पाच लाख रुपये दिले. पण आता मी त्याची मागणी पुरी करू शकत नाही. म्हणून मी तुझी मदत घ्यायची असे ठरवले.” “मी पुण्यात आल्या आल्या या प्रकरणात लक्ष घालते. तू काळजी करू नकोस. एक कर यापुढे त्याला एकही पैसा देऊ नकोस.” “तू सांगशील तसेच मी करेन. मी तुला त्या माणसाचा पत्ता कळवतो. तू तिकडेच ये. आज आपण या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावूनच टाकू”
...
क्रांती शशांकने दिलेल्या पत्त्यावर पोहोचली. ही जागा जरा गावाबाहेर होती. दुपारची वेळ असल्याने रस्त्यावर सामसुम होती. पाच सहा गुंठ्याच्या जागेत कोपऱ्यात छोटे घर बांधलेले होते. शशांकचा कुठे पत्ता नव्हता. क्रांतीने जाऊन दारावर टकटक केले. आतून काहीच आवाज येत नव्हता. तिने परत जोराने टकटक केले तसे दार थोडे उघडले गेले. दार ढकलून ती आत पाहू लागली. एक माणूस जमिनीवर पडला होता. त्याचे डोळे उघडे होते. कुणीतरी त्याचा गळा घोटला होता. तिने पोलिसांना फोन केला. डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्यातून इन्स्पेक्टर गुंजाळ आले. ते क्रांतीला ओळखत होते. “काय ताई. इकडे कुठे प्रेत शोधत आलात? आम्हाला काही तुम्हीं स्वस्थ बसू देऊ नका. कोण आहे हा माणूस?” ‘मला याचे नाव माहित नाही. माझी गाडी बंद पडली म्हणून मदत मागायला आले होते तर हे प्रेत दिसले.’ ‘ काय राव खरे सांगा की. कुठले प्रकरण आहे तुमच्याकडे?’ “मी खरेच सांगतीय. थोड्या वेळापूर्वीच मुंबईहून आले. घरून गाडी घेऊन आता मावशीकडे चालले होते वारज्याला. माझी आईपण तिकडेच आहे.” “हं.” हे बोलताना गुंजाळ खोलीचे निरीक्षण करत होते. हवालदार प्रेताची तपासणी करत होता. तिथे त्यांना एक कागदाचा तुकडा दिसला. ते कपड्याच्या दुकानाचे बिल होते. पत्ता होता FC रस्ता. तेवढ्यात क्रांतीच्या मोबाईलची घंटी वाजली. “गुंजाळ सर मी निघु का?” “हो चालेल.”
“शशांक कुठे आहेस तू?” “मी या घरासमोरच आहे. बाहेर पोलिसांची जीप दिसली म्हणून आत आलो नाही. काय झाले आहे?” “इथे एका माणसाचा खून झालाय. तू इकडे येऊ नकोस. मीच बाहेर येतीय.” “अरे बाप रे. हा तोच माणूस असणार. आता काय करायचे?” “आत्ता तरी आपण काहीच करू शकत नाही. नंतर बघूया काय करता येईल ते. उद्या तू आमच्या ऑफिसमध्ये ये.”
क्रांती ऑफिसमध्ये पोहोचली तेव्हा अजिंक्यने तिला सीमाच्या भेटीबद्दल सांगितले. क्रांतीनेही त्याला शशांकच्या संदर्भातल्या सर्व घटना सांगितल्या. मोबईलवरचा खून झालेल्या माणसाचा फोटो जेव्हा तिने अजिंक्यला दाखवला तेव्हा सीमावर पाळत ठेवणारा माणूस हाच असल्याची त्याची खात्री पटली. “क्रांती राहुल भारतात आलाय का याबद्दल माहिती मिळव.”
...
सीमा रात्री घरी पोहोचली. शशांक अजुन आला नव्हता. तिने दिवा लावला आणि ती दचकली. राहुल रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याच्या डोक्यावर जखम होती. आजुबाजुला काचेच्या फुलदानाचे तुकडे विखुरलेले होते. तिला ते दृश्य बघवेना. बाहेर येऊन तिने अजिंक्यला फोन लावला. अजिंक्यने पोलिसांना फोन लावून सीमाचा पत्ता दिला. अजिंक्य आणि क्रांती दहा मिनिटात तिथे पोहोचले. मागोमाग गुंजाळही तिथे आले. “चला आता मला तुमच्याकडून सर्व ऐकायचे आहे.” अजिंक्यने त्यांना सुरुवातीपासून सर्व सांगितले. “याचा अर्थ सीमाबाई हे दोन्ही खून तुम्हीच केलेत.” “नाही हो. मी घरी आत्ताच येतीय.” “असं तुम्ही म्हणताय. पण खुनाचा हेतू तुमच्याकडेच होता. ही पावती तुम्ही ओळखता का?” “हो. मी परवाच इथून खरेदी केली होती?” त्यांनी दुपारी खून झालेल्या माणसाचा फोटो काढून दाखविला. “या प्रेताजवळ ही पावती पडलेली होती. चला, मला तुम्हाला ताब्यात घ्यावे लागेल.” सीमाला जीपमध्ये बसवत असताना शशांक तिथे येऊन पोहोचला. सीमाला नेताना पाहून तो एवढा हादरला की काही वेळ त्याच्या तोंडातून शब्दच फुटला नाही. अजिंक्यने त्याला पाणी दिले. तो थोडा शांत झाल्यावर त्याला पैशांची व्यवस्था करायला सांगितली. “आपण तिला उद्या बेलवर सोडवूया.”
...
सकाळी नऊ वाजता शशांक अजिंक्यच्या ऑफिसमध्ये पोहोचला. “अरे शशांक तू होतास कुठे? सीमाला त्यांनी सोडले आहे.” “काय सांगता? मी आत्ताच घरी जातो.” अजिंक्यचे पुढील बोलणे ऐकून न घेताच तो घाईघाईने निघून गेला. अजिंक्य विचारात पडला. “क्रांती लवकर चल.” “अरे काय झाले?” “वाटेत सांगतो.” आधी पोलिसांना फोन लाव.” ते सीमाच्या घरी पोहोचले. आतून सीमाच्या बोलण्याचा आवाज येत होता. “शशांक, सॉरी मी तुला आधीच सांगायला हवे होते.” “मला सर्व कळले आहे. तू निर्दोष आहेस हे पोलिसांना कळले का?” “होय. म्हणून तर त्यांनी मला सोडले. फक्त ते सिद्ध होईपर्यंत आपल्याला थोडी वाट पहावी लागेल.” “पण वाट पहायला माझ्याकडे वेळ नाहीय. तू माझ्या आकांक्षांवर पाणी फिरवले आहेस. मी तुला माफ करू शकत नाही”. असे म्हणून त्याने फुटलेले फुलदान सीमावर उगारले. तेवढ्यात आत शिरलेल्या अजिंक्यने त्याचा हात वरच्यावर पकडला आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
गुंजाळ म्हणाले’ “अजिंक्य तुला कसे कळले शशांक या मागे आहे ते?”
“सीमाने मला राहूलबद्दल सांगितल्यावर मी त्याच्याबद्दल चौकशी केली. तो परदेशात नोकरी करत होता. शशांकची शिफारसही त्यानेच केल्याचे कळले. याचा अर्थ दोघांमध्ये मैत्री होती. त्याच्याशी मुद्दाम ओळख शशांकनेच करून घेतली असावी. राहुलचे रेकॉर्ड स्वच्छ आहे असे कळले. पण शशांकबद्दल मात्र चांगले मत नाही. अफरातफरीवरून त्याला नोटीसही दिली गेलेली होती. त्याने बदली मागताच त्याला भारतात पाठवले गेले. शशांकच्या वडिलांनी सीमाला मागणी त्याच्या सांगण्यावरूनच घातली होती. यावरून मी काही निष्कर्ष काढले. त्याला सीमा आणि राहुलच्या प्रकरणाबद्दल आधीच माहित होते हे त्याने क्रांतीला सांगितले होते. सीमा आमच्याकडे आली आहे हे त्याला माहित नव्हते. कुणालाही असेच वाटले असते की शशांकचे सीमावर खरेच प्रेम आहे. मी त्याची माहिती काढली तेव्हा कळले की तो आत्ताच्य कंपनीतही अफरातफर करतोय. त्याला रेस जुगाराचा नाद आहे. खूप कर्ज करून ठेवलीयत त्याने. ज्या पैशासाठी त्याने सीमाशी लग्न केले तोही त्याला हातात मिळाला नाही तेव्हा त्याने तिला ब्लॅक्मेल करायचे ठरवले. त्याने राहुललाही यात ओढायचे ठरविले. पण राहुल आयुष्यात आता मार्गी लागल्याने त्याने शशांकला साथ द्यायची नाही असे ठरविले असावे. सीमाला त्रास देण्यासाठी त्याने त्या माणसाचा वापर केला. परंतु त्या माणसाला पैसे देता न आल्याने दोघांच्यात भांडण झाले असावे. त्यातून तो खून झाला असणार. तो आळ सीमावर टाकायचे त्याने ठरविले. हे काम पुरुषाचे आहे हे तर सरळच आहे. स्त्री काही गळा दाबायचे काम करू शकणार नाही.”
“त्याने राहुलला का मारले?”
“राहुलकडचे फोटो गायब झाल्याचे त्याच्या लक्षात आल्यावर सीमाला सावध करायला तो आला असणार. तो भारतात यायला निघालाय हे त्याच्या कंपनीमधून मला कळले होते. तो सीमाच्या घरी गेल्यावर त्याला शशांक भेटला असणार.”
“सीमाच्या घरचा पत्ता त्याला कसा मिळाला?”
“तो परवाच भारतात आलाय. ती कुठे काम करते हे त्याला माहित होते. काल संध्याकाळी तो सीमाला भेटला. तेव्हा तिने रागावून त्याचे काहीही ऐकून घेतले नाही. उलट तो माणूस त्यानेच तिच्यामागे पाठवला असा आरोप करून ती निघून गेली. हे सर्व तिने फोन करून मला सांगितले. आज सकाळी शशांक ऑफिसमध्ये आला तेव्हा मी त्याच्या हाताला जखम पहिली. जखम ताजी होती. त्यावरून त्यानेच राहुलला मारले असावे असे मला वाटले. आणि सीमाला सोडल्याचे कळताच तो ज्याप्रकारे येथून निघून गेला त्यावरून सीमाला धोका असल्याचे माझ्या लक्षात आले. त्याच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता. उलट विचित्र वेडसर भाव होते. मला चौकशीत कळले होते की त्याची आई वेडी होती. वेड्यांच्या इस्पितळातच तिचा मृत्यू झाला होता.”
“त्याची चौकशी कराल तेव्हा माझे अंदाज खरे आहेत की नाही हे तुम्हाला कळेलच”. थोड्यावेळाने पोलीस स्टेशनमधून फोन आला, “Hats off अजिंक्य. तुझे अंदाज तंतोतंत खरे आहेत.”

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाचली.

अजिंक्य कडे जादू आहे की कर्णपिशाच्च. इतक्या फास्ट सगळ्यांचं पुर्वायुष्य शोधलं आणि राहुल खुळा वाटतोय.

काना, मात्रा, वेलांटी, टिम्ब सगळेच गाळलेत का उमटले नाही. स्टोरी वाचताना सगळेच लावावे लागतात आणि अडथळा होतो वाचायला. सॉरी.

जमलीये.
शेवट जरा फास्ट झाला.
टायपो सुधारा.

काना, मात्रा, वेलांटी, टिम्ब सगळेच गाळलेत का उमटले नाही. स्टोरी वाचताना सगळेच लावावे लागतात आणि अडथळा होतो वाचायला. सॉरी>>>>>हे कशाबद्दल लिहिलंय? कथेत काना, मात्रा, वेलांटी, टिम्ब आणि विरामचिन्ह पण बरीच वापरली आहेत.