ती अशीच असते - १ व २

Submitted by Asu on 22 July, 2019 - 09:04

कवितेमध्ये काही वेगळं करण्याचा प्रयत्न-
सादर करीत आहे आशय एक, विषय दोन अशी जोड कविता-

*ती अशीच असते - १*

तिची जेव्हा आठवण येते
तीच समोर येऊन रुसते
कितीही गोंजारलं
कितीही अंजारलं
तरीही मनात लपून बसते

रुसवा-फुगवा किती सांभाळा
परंतु ती अशीच असते
पेनाच्या शाईत
मनाच्या वहीत
शब्दाशब्दात लपून असते

एकदा मात्र हसली की
पेन टेकताच कागदावर
झर झर, झर झर
पानावर उतरत असते

परंतु ती अशीच असते
रुसवा-फुगवा कितीही सांभाळा
तिला वाटेल तेव्हाच हसते
हसल्यावर मात्र बिनधास्त असते
अलगद वहीत जाऊन बसते

*****

*ती अशीच असते - २*

तिची जेव्हा आठवण येते
तीच समोर येऊन रुसते
कितीही गोंजारलं
कितीही अंजारलं
तरीही मनात लपून बसते
रुसवा-फुगवा कितीही सांभाळा
परंतु ती अशीच असते
चहाच्या बशीत
मनाच्या कुशीत
पावलोपावली लपून असते
एकदा मात्र हसली की
ओठ टेकता ओठांवर
झर झर, झर झर
अंगावर विरघळत असते
परंतु ती अशीच असते
रुसवा-फुगवा किती सांभाळावा
तिला वाटेल तेव्हाच हसते
हसल्यावर मात्र बिनधास्त असते
अलगद हृदयात जाऊन बसते

प्रा.अरूण सु. पाटील (असु)
(दि.22.07.2019)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

Group content visibility: 
Use group defaults