तो, तोच तो

Submitted by सुंदरराव on 21 July, 2019 - 11:37

तो, हो तोच तो
पुरता झालाय पागल
ओळखेना कुणाला
बनलाय बेताल
परत परत तेच ते
शब्द आणि वाक्यं
पुटपुटतो स्वत:शी
तुटलाय आतून
हसतोय रडतोय
कण्हतोय कुथतोय
कुणाचं कुणाला
देतोय नाव
तो, तोच तो
दिसला वाटेत
बाजूला व्हा
वाट बदला
नाहीतर म्हणेल जग
तुम्हालाच मुर्ख
पागलच्या नादाला
पाहिलंय कुणाला

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults