मधमाशीची झप्पी

Submitted by Dr Raju Kasambe on 21 July, 2019 - 08:00

मधमाशीची झप्पी

नाचे गुणगुणे ह्या मधमाशा
कळेना आम्हा त्यांची गूढ भाषा !

मारून भरार्‍या चहूदिशेला
झप्पी देई ती फुलाफुलाला !

भरून घेई परागकणांची झोळी
वाटा उचलते बांधण्यात पोळी !

थेंबा थेंबाने करते संचय मधाचा
शिकावा तिजकडून मंत्र बचतीचा !

परागणाचे करते अचाट काम
नकळत देई ती करोडोचा दाम !

हसती फुले मधमाशीच्या झप्पीने
मळे, फळबागा डुलती आनंदाने !

मधमाशांचे प्रमाण का घटले
कोडे शास्त्रज्ञांना नाही सुटले !

Group content visibility: 
Use group defaults

छान कविता.
(आता परत एकदा अवांतर, माफ करा.)
एकुण प्राणीसृष्टी, वनस्पती सृष्टी एक प्रकारच्या हार्मनीमध्ये असतात. त्यांची बरीच कामे जैविक घड्याळाप्रमाणे चालू असतात. शिवाय ते जैविक कचराच तयार करतात. त्यामुळे प्रदुषण कोणतंच करत नाहीत. मानवाने विज्ञानाच्या सहाय्याने केलेली उलथापालथ अनेक प्रकारचे प्रदुषणाला जबाबदार आहे. प्राण्यांना गोंगाटाचा फार त्रास होत असावा असे मला वाटते. अजून बरेच लिहिता येईल. पण थांबतो.