नव्या युगाची पहाट

Submitted by राजेंद्र देवी on 20 July, 2019 - 12:20

नव्या युगाची पहाट

आल्हाददायक तुझे आगमन
दिनकरा, जसे आमचे बालपण

तळपत असते माध्यान्य
भास्करा, जसे आमचे तरुणपण

मलूल असते संध्याकाळ
दिवाकरा, जसे आमचे म्हातारपण

कापून टाक या किरणांनी
मरिचया, संसाराचे हे मायाजाल

घे कवेत मला हे अग्निरुप
हिरण्यगर्भा, कर पापांचा नायनाट

करून टाक भस्म हा नश्वर देह
अदित्या, उगवू दे नव्या युगाची पहाट

राजेंद्र देवी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रथम माफी मागतो.
आयुष्याच्या अखेरीस सगळं उपभोगून शरीर साथ देत नाही तेव्हा कोल्ह्याला द्राक्ष आंबट न्यायाने संसार मायाजाल वाटू लागते. पापं का आठवली. पुण्य का नाही.
आदित्य ( सूर्य) शी तुलना करताना प्रभात जशी तजेला घेऊन येते तसाच दिवस आनंदात/ सत्कर्मात गेला असेल तर संध्या देखील रमणीय, आल्हाददायक वाटते.
कृपया राग मानू नये.

मन्याS, हो https://www.maayboli.com/node/52916

शशिकांतजी आपण रस घेऊन कविता वाचली, आपला प्रतिसाद योग्यच आहे पण त्यात तुम्ही तेच सांगितले आहे दिवस सत्कर्मात गेला असेल तर, पण आयुष्य सगळयांचे एवढे सरळ थोडेच असते, कोणाचे बालपण पण करपलेलं असू शकते पण हाच आशावाद मांडला आहे की नव्या युगाची पहाट यावी.