स्वप्नातले कोंकण

Submitted by राजेंद्र देवी on 18 July, 2019 - 23:59

स्वप्नातले कोंकण

साधेच घर माझे , छोटेसे अंगण
त्यात अवतरले, सारे वृक्षगण

अंगणात माझ्या, तुळशी वृंदावन
माथ्यावर दूर्वा, दुडदुडतो गजानन

अंगणात माझ्या, कर्दळीचे पान
घालतो मांडव, संतुष्ट होई सत्यनारायण

नारळ सुपारी डुले, आहे त्यास मान
नैवेद्याला सजते, केळीचे पान

परसदारी फुलती फुले, दारी आंब्याचे तोरण
शंकरास वाहते, बेलाचे पान

स्वप्न माझे साधे, सदाहरित कोंकण
त्यात असावे घरकुल माझे छान

राजेंद्र देवी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान कविता. दुडदुडतो गजानन ऐवजी शोभतो गजानन असे चाललं असतं काय. कोंकण नाही आवडत, आपलं कोकण च आवडते.

सुंदर कविता

https://www.maayboli.com/node/63532

माझ्या ह्या फुलांच्या गन्धकोशी ह्या लेखावर प्रतिसाद म्हणून ही रचना आपण केली होती.

पण त्या प्रतिसादात ती हरवून गेली असती. स्वतंत्र धागा काढला हे खुप छान केलेत.

मानिमोहोरजी, हा स्वतंत्र धागा 2015 मध्ये काढला होता पण माबोकारांकडून तो दुर्लक्षिला गेला होता तो मी आपल्या प्रतिसादात दिला होता. तो मी पुनः प्रसारित केला. आपण तो अजून आठवणीत ठेवला याचा आनंद वाटला, धन्यवाद.
https://www.maayboli.com/node/53762

सुंदर