स्वप्नातले कोंकण

Submitted by राजेंद्र देवी on 18 July, 2019 - 23:58

स्वप्नातले कोंकण

साधेच घर माझे , छोटेसे अंगण
त्यात अवतरले, सारे वृक्षगण

अंगणात माझ्या, तुळशी वृंदावन
माथ्यावर दूर्वा, दुडदुडतो गजानन

अंगणात माझ्या, कर्दळीचे पान
घालतो मांडव, संतुष्ट होई सत्यनारायण

नारळ सुपारी डुले, आहे त्यास मान
नैवेद्याला सजते, केळीचे पान

परसदारी फुलती फुले, दारी आंब्याचे तोरण
शंकरास वाहते, बेलाचे पान

स्वप्न माझे साधे, सदाहरित कोंकण
त्यात असावे घरकुल माझे छान

राजेंद्र देवी

Group content visibility: 
Use group defaults

चौथ्या कडव्यातल्या पहिल्या ओळीतील, "आहे" किंवा "त्यास" यापैकी एक शब्द जर काढून टाकला, अन पाचव्या कडव्यातील पहिल्या पंक्तीमधले "फुलती" व "आंब्याचे" हे दोन शब्द काढून टाकले, तर हे काव्य अजून लयबद्ध होईल