प्रथम तुज पाहता

Submitted by Pradnyas on 17 July, 2019 - 03:33

निरागस अश्या डोळ्यात त्याच्या
अगम्य कसले गुढ असे
लोभसवान्या चेहर्यास त्याच्या
नेत्र मात्र हे शोभून दिसे

अदम्य इच्छा होई माझी
त्या नयनात हरवण्याची
पाहताच क्षणी डोळ्यात त्या
नजर माझी चोरली जायची

या सार्यास अनभिज्ञ असा
तो एक गोड हसरा चेहरा
पाहून त्यास मी अडखळले,बावरले
परी क्षणात मज मी सावरले

पण त्या नयनांची अगम्य शक्ती
नजर पुनः खेचली जायची
कळेचना कसे थोपवू तिला
विसरून स्वतःस ती करेल भक्ती

हवीहवीशी ही असे भावना
निरागसता ती डोळ्यात मावेना
होता परी त्यांची नजरानजर
मीच माझी राहीलेना

डोळ्यात त्याच्या हरवताना
मग राजबिंडा तो का नसेना
दिसले मजला जग ते सुंदर
भलेही तो का स्वर्ग नसेना

ओढ अशी त्या निरागसतेची
हरेक सीमा मी लांघली होती
भूलले मोहाच्या त्या क्षणापायी
की ही भावनाच एकतर्फी होती

Group content visibility: 
Public - accessible to all site users