काय शीर्षक द्यावं?

Submitted by खान९९ on 16 July, 2019 - 20:02

ती ना हो म्हणाली
ना ती नाही म्हणाली
वेळ पुढे सरकत गेली
मी होकाराची वाट पाहिली
ती लाजून बघत राहीली
पण ओठांनी नाही बोलली
मी अजून वाट पाहिली
तिची चलबिचल पाहिली
पण शब्दात नाही बोलली
कळली होती जरी तिची देहबोली
पण मी स्पष्ट होकाराची वाट पाहिली
शेवटी वेळ अशीच निघून गेली
ती साता समुद्रापार निघून गेली
खरं सांगायचं तर दुसऱ्या कुणाची झाली
वाट पाहताना माझीच वाट लागली
सांगू कसे मलाच माझी लाज वाटली

Group content visibility: 
Use group defaults