बंडखोर

Submitted by अमर विश्वास on 15 July, 2019 - 08:07

श्री अतुल ठाकुर यांचा "व्यसन, एक दुर्दैवी निरिक्षण" हा लेख वाचला आणि परत एकदा अस्वस्थ झालो .... त्यावर प्रतिक्रिया देताना नाशायात्रा आणि बंडखोर या दोन पुस्तकांचा उल्लेख केला ...
हा लेख हे पुस्तक परिक्षण नाही... याचे लेखक तुषार नातू हे स्वतः व्यसनातून बाहेर पडले आणि आता नागपूरजवळ व्यसनमुक्ती केंद्र चालवतात. थोपु (फेसबुक) च्या माध्यमातून त्यांच्याशी ओळख झाली. त्यांच्या बंडखोर या पुस्तकावर दिलेला हा एक साधा अभिप्राय आहे ... त्यामुळे कुठलाही बदल न करत तसाच देत आहे
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

तुषार नातू यांचे नाव सर्वप्रथम माहित झाले ते "नशायात्रा" मुळे.... हे पुस्तक वाचून सुन्न झालो होतो .... त्यानंतर कित्येक दिवस पार्टी करताना उगाचच अपराधी वाटायचं ... प्रामाणिकपणे सांगायचं तर दोन तीन महिन्यातून एकदा होणारी आमच्या मित्रांची "बैठक" कधी मोडली नाही... पण आपण कुठे वाहवत जाऊ नये हे भान मात्र नक्की जोपासलं .... हा "नशायात्रा" चा विजय कि आमच्या बनचुके कोडगेपणाने केलेला पराभव ? जाऊदे ....
त्यानंतर फेसबुकच्या माध्यमातून आमची मैत्रीही झाली ...

अशातच बर्वेबुवांनी "बंडखोर" ची घोषणा केली. तुषारजींनीही या पुस्तकामगाची आपली भूमिका व्यक्त केली ... लगेचच हे पुस्तक मागवले .. हातातही मिळाले .. लगेचच वाचूनही झाले ... पण प्रतिक्रिया लिहिण्याचे राहून जात होते... काय लिहिणार ? राहून राहून तुषार नातूंचीच एक पोस्ट डोळ्यासमोर नाचत होती
"तो तुषार नातू किती भारी लिहितो नाही ?? असे म्हणत त्यांनी आपले ग्लास उंचावले " आपल्याही वागण्यात हाच विरोधाभास नाही का?

पण तरीही....
व्यसनांबद्दल आपले अनेक गैरसमज असतात (व्यसनी माणसांबद्दल तर जास्तच Happy ) या पुस्तकामुळे हे गैरसमज दूर होण्यास बरीच मदत होईल.
व्यसन हा एक मनोशारीरिक विकार आहे .. व्यसन हे नुसत्या औषधामुळे बरे होत नाही तर त्याला मानसिक उपचारांची गरज असते (हे वाचकांच्या मनावर ठसवणे हे उद्दिष्ट या पुस्तकामुळे नक्कीच साध्य होते)
पुस्तकात सुरवातीलाच व्यसनांचे विविध प्रकार व त्याचा आपल्यावर होणारा परिणाम ह्याबद्दल माहिती दिल्यावर तुषारजी त्यावरच्या उपचारपद्धतीबद्दलही उत्तम माहिती देतात. AA किंवा अल्कोहोल अनॉनिमस बद्दलची महतीही उत्तम. अधिक सविस्तरपणे आली असती तर आवडले असते .. पुस्तकातील त्यानंतरचे अनुभव हे वेगवेगळ्या केसेसवर आधारित आहेत .. काही यशस्वी .. समाधान देणारे तर काही चटका लावून जाणारे ...

थोडक्यात सांगायचे तर हे पुस्तक वाचल्यावर स्वत: व्यसनांपासून दूर राहावे ही प्रेरणा (भीती ?? Happy ) तर मिळतेच पण त्याबरोबर इतरांना यापासुन परावृत्त करण्याचे बाळही मिळते .. शेवटी व्यसन टाळणे / व्यसनमुक्ती यात सर्वाधिक महत्वाची भूमिका हे जवळच्या माणसांचीच असते ..

पण हे पुस्तक व्यसनांच्या मार्गावरील नो एन्ट्री च्या बोर्ड सारखे कार्य करेल याबद्दलही खात्री आहेच ... तरीही काही जण या नो एन्ट्रीत घुसले तर त्यांना परत योग्य मार्गावर कसे आणायचे हेही याच पुस्तकातून कळेल ...

तुषार नातूंच्या व्यसनमुक्तीच्या कार्यात हे पुस्तकाने हातभार लागेल हे नक्की ..

त्याच्या पुढील कार्याला शुभेच्छा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुस्तकावर दिलेला हा एक साधा अभिप्राय म्हणून ठीक आहे पण इथे वेगळा धागा काढून मांडलेले लिखाण वाचताना खूपच त्रोटक आणि काही जागी संदर्भरहित वाटतंय. उदा.
अशातच बर्वेबुवांनी "बंडखोर" ची घोषणा केली. तुषारजींनीही या पुस्तकामगाची आपली भूमिका व्यक्त केली ... >>>
ह्यातले बर्वे बुवा कोण?

जे लिहिलेय ते चांगले आहे म्हणून(च) विनंती आहे की आळस झटकून ह्या लिखाणाचा विस्तार करावा. 'नशायात्रा' बद्दलही लिहा(च). कृ. ध.

धन्यवाद हर्पेन जी

अतुल ठाकूर यांचा लेख वाचून सहज आठवले म्हणून जुनाच प्रतिसाद जसाच्या तास टाकला ...
बंडखोर बद्दल आणि त्या निमित्ताने दारू पिणाऱ्यांबद्दल विस्तृत पाने नक्की लिहितो ...