वर्षाव प्रेमाचा

Submitted by Asu on 15 July, 2019 - 01:17

वर्षाव प्रेमाचा

हेतू तिचा नि त्याचा
नव्हताच प्रेमाचा
दैवाने एकत्र आले
प्रयत्न जगण्याचा

बंधांना अंकुर फुटती
अनुबंधांच्या उबेत
बांधती एकत्र कधी
एकमेकांना कवेत

श्वासात श्वास मिसळता
जगण्यास जाग येते
हृदयास हृदय भेटता
स्पंदन एक होते

ध्यानीमनी नसता
घटना अशा घडती
निरभ्र आकाशात
प्रेमाचे ढग जमती

असा अचानक होतो
वर्षाव प्रेमाचा
हेतू तिचा नि त्याचा
नव्हता जरी प्रेमाचा

प्रा. अरूण सु. पाटील (असु)
(दि.15.07.2019)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

Group content visibility: 
Use group defaults