समर्पण

Submitted by Asu on 11 July, 2019 - 23:02

पाटील परिवाराकडून सर्व आप्तेष्टांना, मित्र परिवारास आणि रसिकांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

समर्पण

वारकरी मी साधा भोळा, तव नामाचा लाविला टिळा
प्रिय तुला जी तुळशीमाळा, सदैव असे माझिया गळा

घरदार, संसार सोडला; सोडली माया ममता सगळी
तुझ्या दर्शना पळत निघालो, भूक विसरून पायदळी

टाळ चिपळी लयीत संगे, अवघा देह झाला मृदंग
मुखा मुखातून आज गर्जे, नामा तुकयाचेच अभंग

नाम सदा तुझेच मुखी, दिवस-रात्र अन् सांज सकाळी
टाळ-मृदुंग गजर नभी, हाती पताका खांद्यावर झोळी

पंढरपूर मज मोक्ष नगरी,आलो मी स्वर्गाच्या दारी
आस भेटीची केवळ देवा, दर्शन द्यावे नको दुरावा

रूप देखिले तव सगुण सुंदर, हरिनामाचा गजर निरंतर
देह ठेविता तव चरणावर, तुझ्या माझ्यातले मिटले अंतर

जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल, पांडुरंग पांडुरंग
जयघोष घुमतो वाळवंटी,भक्त अवघे कीर्तनी दंग

प्रा.अरूण सु.पाटील (असु)
(दि.12.07.2019)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults