अरे अरे पावसा!

Submitted by प्रांजलीप्रानम on 11 July, 2019 - 13:42

अरे अरे पावसा!

अवेळी येण्याने तुझ्या
वल्डकप हुकलं
काल दडून बसणं तुझ
खरचं खूप चूकलं

अवेळी येणे तुझे
मोठ्या मनाने क्षमवले
काल तुझ्या न येण्याने
खुप काही गमवले

हूरहूर लागते जीवाला
कालचा दिवस
असा का आला
काय झाले असते
जर तुही असतास
बरसून गेला

नंबर वन होऊनही
कुठे माशी शिंकली
एेन वेळी काय झाले
खेळी नाही जिंकली

वल्डकप दूरावल्याने
कसे आम्ही आवरू
नाही ना हे
पेल्यातले वादळ
मनाला कसे सावरू

इतक्या थोड्या धावांनी हरणं
खरचं आम्हा पचत नाही
प्रोसेसमधून त्या बाहेर पडणं
जराही मनाला रूचत नाही
....प्रांजली

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults