ती...

Submitted by के अंजली on 11 July, 2019 - 01:25

ती सलज्ज वेडी अनुभूतीची लाट
मी बंधनल्याली बावरली वहिवाट

ती कृष्णनिळाई सावळली घनदाट
मी अस्फूट अर्धी पांघरली जगहाट.....

ती अव़खळ वारा भिरभिरभिर पानांशी
मी हिरमुट धुसमुस मनभरल्या गाण्यांशी

ती अनवट गुणगुण चंचल होऊन गाते
मी रिक्त रिक्तशी काठांवरूनी जाते.....

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्या बात है ...

खूप महिन्यांनी का खूप वर्षांनी !!

अप्रतिम..‌
वरचेवर लिहा असच सुरेख‌.‌

अप्रतिम....
नादमय, तालमय कविता...
शब्दांची पुनरुक्तीही छानच...