हृदयाची राणी

Submitted by Asu on 8 July, 2019 - 10:37

हृदयाची राणी

मी व्याकुळ होतो आणि
तू गावी मनात गाणी
नाकारले जरी तू मजला
तूच मम हृदयाची राणी

तू गा आनंदाची गाणी
गाईन मी तुझी विराणी
भेटीची तव आस मजला
तूच मम हृदयाची राणी

मी सांगेन ना गाऱ्हाणी
हृदयाचे जरी झाले पाणी
प्रेमाचा तव ध्यास मजला
तूच मम हृदयाची राणी

करू नकोस तू बतावणी
नको सांगू काही कहाणी
दुःख जरी तू दिले मजला
तूच मम हृदयाची राणी

जखमा तव जपल्या मन्मनी
काढू नकोस खपल्या सजणी
दुःखाची तव ठेव मजला
तूच मम हृदयाची राणी

मी देहावर सोडले पाणी
तव हृदयी माझीच निशाणी
मी व्याकुळ होईन आणि
मी गाईन तुझीच गाणी

प्रा.अरूण सु.पाटील (असु)
(दि.08.07.2019)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults