तर्काच्या सीमेवर तेव्हा

Submitted by अनन्त्_यात्री on 5 July, 2019 - 08:31

स्थलकालाचे ताणेबाणे
चिवट तरीही तटतट तुटले
घालित अवघड नवे उखाणे
जडातुनी चैतन्य उमलले
सप्तरंग लवथवले, मिटले
सप्तसूर झंकारुन शमले
भवतालाला भारून काही
पुन्हा प्रशांत झाले
तर्काच्या सीमेवर तेव्हा
अतर्क्य गवसत गेले

Group content visibility: 
Use group defaults