भुताळी दवाखाना

Submitted by बोकलत on 29 June, 2019 - 12:37

कोकणातलं साधारण एक दोनशे अडीचशे उंबरठा असलेलं आमचं गाव. बालपण कोकणातच गेलं. त्याकाळी टीव्ही होते पण केबलचा म्हणावा तेव्हडा सुळसुळाट झाला न्हवता. रात्री सगळ्यांची जेवणं आटपली कि आजूबाजूचे सगळे ओटीवर जमायचे आणि गप्पांचा फड रंगायचा. राजकारण, क्रिकेट, गावातल्या घडामोडी आणि लाईट गेलेली असली कि भुतांच्या गोष्टी सांगितल्या जायच्या, भुतांच्या गोष्टी निघाल्या कि दवाखान्याचा हमखास उल्लेख व्हायचा. आडवळणावर असलेला तो दवाखाना तीस चाळीस वर्षे तसाच भकास पडून आहे. हा दवाखाना बांधण्याच्या अगोदर ही जागा गुरांसाठी चारण्याचं माळरान होतं. ही जागा शापित होती म्हणतात.लोकांना पछाडणं ,विचित्र भास होणं, रात्रीच्या वेळी भलतंच काहीतरी दिसणं असे प्रकार नेहमीचे होते.दवाखाना बांधला आणि काही दिवसातच या जागेने रंग दाखवायला सुरवात केली. रात्री किंचाळण्याचे आवाज येणं, कोणीतरी दिसणं, लाईट अचानक चालू बंद होणं, रुग्णांची तब्येत अचानक बिघडणं असले प्रकार सर्रास होऊ लागले. या घटनांमुळे हे हॉस्पिटल काही महिन्यातच बंद पडलं.अर्थात या सगळ्या ऐकीव गोष्टी. खरं खोटं देव जाणे.
लहानपणी आजीसोबत शेतावर जायचो तेव्हा दुरून हा दवाखाना दिसायचा. तिथे भुतं राहतात हीच त्याची बालवयात झालेली ओळख. नंतर साधारण सहावी सातवीत असेल काकाजवळ हट्ट करून या जागेवर पहिल्यांदा गेलो. तेव्हा खरोखरच भकास वाटली ही जागा. आतमध्ये गेलो तर नक्की कोणीतरी भूत आपल्या मानगुटीवर बसणार असं काहीतरी वाटत होतं. नंतर जाणं झालं ते मित्रांसोबत, यावेळी पाच सहा जणं होतो त्यामुळे थोडा धीर करून आतमध्ये गेलो. मस्त प्रशस्त दवाखाना होता. एकंदर बांधणीवरुन त्याकाळात एखाद्या खेडेगावात एव्हडा मोठा आणि प्रशस्त दवाखाना का बांधला असेल असा विचार मनात आला. एक आयताकृती मोठं बांधकाम, मधोमध गार्डन. समोर एक भला मोठा पॅसेज, आजूबाजूला भरपूर खोल्या, समोर प्रशस्त जागा असं आपलं अशा आपल्या रूपात तो दिमाखदारपणे उभा होता.पहिल्या वेळी थोडी भीती वाटली नंतर जरा सेट झाल्यावर इकडे तिकडे मोकळेपणी पण जरा दबकत दबकत फिरायला लागलो. खोल्यांमध्ये असणारे बेड आणि लटकलेल्या सलाईन भीती वाढवत होते,पण शांतता कमालीची होती. थोडा वेळ इकडे तिकडे भटकून नंतर घरी परतलो. थोडे दिवस गेले एकदा सहज त्या वाटेवरून येत होतो, काय झालं अचानक काय माहित मला चक्क त्या दवाखान्यात जायची इच्छा झाली. थोडा धीर करून प्रथम दरवाज्याजवळ गेलो, नंतर आतमध्ये गेलो, शांततेशिवाय तिथे कोणीही न्हवतं. आजही मी गावी गेलो कि एकदातरी तिथे भेट देतो. त्या जागेत नक्कीच काहीतरी आहे जे मला वारंवार तिथे खेचून आणतं.

दवाखान्याचा दर्शनी भाग
1.jpgIMG-20190318-WA0010.jpg

गेल्या गेल्या हा नजारा दिसतो. तो एकदम समोर आहे ना तो पॅसेज. त्याच्या आजूबाजूला खोल्या आणि त्या खोल्यात तुटलेले बेड आणि लटकलेल्या सलाईन. वरती वटवाघळाचा थवा लटकलेला असतो आणि खाली एखाद दुसरा साप हमखास दिसणारच,त्यामुळे संध्याकाळी गेलो कि तिकडे पुढे जायचं शक्यतो टाळतो.
IMG-20190318-WA0004.jpg

इथून त्या पेंटिंगसारख्या त्रिकोणी डोंगराआड होणार सूर्यास्त एकदम लाजवाब
IMG-20190318-WA0013.jpg

गार्डन आता नाहीये पण एके काळी असावं
IMG-20190318-WA0014.jpgIMG-20190318-WA0012.jpgIMG-20190318-WA0007_0.jpg

कोणी काहीही म्हणोत मला या ठिकाणी जायला आवडतं. मला या ठिकाणी भुतं आहेत कि नाही ते माहित नाही पण धावपळीच्या रुटीनपासून वेगळं झाल्यावर मनाला जी शांतता लागते ती इथे नक्की आहे. मला संध्याळाकी इथे यायला आवडतं, ही शांतात मला कुठेतरी भूतकाळात घेऊन जाते आणि कितीतरी विस्मरणात गेलेले प्रसंग डोळ्यासमोर आणून ओठावर हसू फुलवते. इतके दिवस झाले मला तरी इथे काय अमानवीय जाणवलं नाही फोटो बघा तुम्हाला काय जाणवतंय का.

Group content visibility: 
Use group defaults

मन्या पाँइंट्स काढण्यापेक्षा भावना समजुन घे.
जिवंत माणस एकलं होतं, जिवंत प्रेत पण असतात. मलातरी हा खुप म्हणजे अतिशय भयंकर आणी भयानक असा भितीदायक प्रकार वाटतोय.

काय आहे हा जिवंत प्रेत प्रकार? आणि कुणी असं लिहिलं तर त्यात कसल्या भावना समजून घायच्या असतात, आणि कशा?

प्रेत जीवंतच असते
आणि मेले की भुत बनते
अशी काहीतरी फिलॉसॉफी असेल.
प्रत्येकाच्या भावनेचा प्रश्न आहे त्यामुळे उगीच कोणाला हसू नए.

जागेतील गूढता फोटोमध्ये दिसतेय !!! रात्री इथे कोणी मेणबत्ती घेऊन उभे राहिले तर भयाण वाटेल. अमानवीय चाहत्यांच्या गटग साठी चांगली जागा आहे Happy

बाप रे।
भयानक दवाखाना, भिती वाटली बघून.
मी पण शोधत होते तुटलेले बेड सलाईनचे फोटो.
परत चक्कर नाही टाकली का बोकलत तिकडे?

Pages