प्रिये तुझ्या विना इथे ...

Submitted by दत्तप्रसन्न on 28 June, 2019 - 20:19

उदास खिन्न वाटते
प्रिये तुझ्या विना इथे
क्षण हजार युगांहूनि
थोर भासे का बरे?

पिलांस आपल्या जरी
कुशीत घेऊनि झोपतो
देण्यास होऊ समर्थ मी
आईची उब कशी बरे?

कधी नव्हे ती जाहली
शांतता अगदी असह्य हि
वाटे काही सांगावेसे
भिंतीशी बोलू किती बरे?

जाण्याने तुझ्या गेले
चैतन्य सारे घरातले
आभाळ गडद जे दाटले
मोकळे करू कसे बरे?

कळी नाजूक आठवणींची
अजुनी गप्प रुसून आहे
शहर सारे ओस पडले
हसवू तिला कोठे बरे?

प्रश्नांची साऱ्या उत्तरे
नाहीत आज आपल्याकडे
योग्य समयी समजेल ते
देवाजीने जे योजिले

Group content visibility: 
Use group defaults

वाह

हदयस्पर्शी!
तु असणे ,
किती छान आहे
नाहीतर हे जग
नुसतेच माणसाचे रान आहे