बरं झालं पावसा तु आलास...

Submitted by विधीग्रज on 26 June, 2019 - 06:48

बरं झालं पावसा तु आलास...
नाही तर दिसत होतं आम्हाला ते मरण
दिसत होतं आम्हाला शेतकऱ्यांच्या उषा खालचं सरणी

दिसत होतं आम्हाला ओसाड पडलेलं शिवार सारं
आणि फाटक्या गणवेशावर शाळेत जाणारी ती पोरं

दिसत होती दूरवरून डोक्यावर पाणी आणणारी ती माय
आणि मूठभर चार्यासाठी हंबरडा फोडणारी ती गाय

दिसत होत्या मोकळ्या पडलेल्या गोण्या आणि कणग्या
नावालाच असणाऱ्या सरकारी योजना आणि देणग्या

तुझ्या येण्याने भरतील तळी आणि बारवे
तुझ्या येण्याने होईल शिवार पुन्हा एकदा हिरवे

तुझ्या येण्याने पोटभर खातील ती उपाशी ढोरं
तुझ्या येण्याने आनंदून जातील ती कुणब्याची पोरं

इच्छा फक्त एवढीच
असाच तु येत रहावा
माझा महाराष्ट्र सुखी व्हावा
-Rushikesh satpute- patil

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

सुरेख लिहिलंय!

येण्याणे ऐवजी येण्याने असं हवंय का? पु.ले.शु! Happy

इच्छा फक्त एवढीच
असाच तु येत रहावा
माझा महाराष्ट्र सुखी व्हावा>>>>तसेच घडो