पावसा

Submitted by JayantiP on 25 June, 2019 - 09:45

पावसा
हे पावसा सालाबादप्रमाणे
जून महिना मृग नक्षत्रावर
तू यावंस धरतीवर
हे ठरलंय ना .
तू येतोस तुझ्या मर्जीने
रेंगाळतोस, बरसतोस, कहर
करतोस तुझ्या रागाने.
पण आजकाल तू फार
खोटारडा झालाहेस.
फार वाट पहायला
लावतो आहेस.
मित्रा असं नको ना वागूस.
माझ्यासारखे नवकवी डोळ्यात
प्राण आणून वाट पाहतो तूझी
तू पडलास तरच फुटतो कंठ
मग सगळीकडे आमची डराव डराव.
पावसाळ्यात बेडकांची गाणी
आणि आमच्या कविता
हेच तू जीवनदाता आहेस
पटवतात सर्वांना.

Group content visibility: 
Use group defaults