बाप कृपाळुवा दत्त

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 24 June, 2019 - 11:30

बाप कृपाळुवा दत्त
********
दिशा गेलेल्या गिळून
जग गेलेले संपून
तुझे अस्तित्व उरले
तन मनाला वेढून

थेंब पाण्यात सांडला
थेंब वाहता जाहला
थेंब थेंबाचा सागर
थेंब म्हणावे कुणाला

वाट धुकट धुसर
नभ ओघळे झांजर
उब पदरी बाळाला
तैसे सुखावे अंतर

सारे दुःखाचे उखाणे
गेले सुखात मुरून
नाव दत्ताचे ओठात
लाज जगाची सोडून

बाप कृपाळुवा दत्त
सवे नाथांचा संघात
झाला भाग्याचा विक्रांत
तया पायी होतो रत

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
००००००

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अति सुंदर. डॉ. साहेब दत्तभक्तीतून तुम्हाला काय काय दृष्टांत झाले, अनुभव आले यावर स्वतंत्र धागा अवश्य काढा. तुमच्या भक्तीला नमस्कार.