बाप

Submitted by तुषार विष्णू खांबल on 24 June, 2019 - 08:08

बाप
शब्दांकन : तुषार खांबल
(चाल : हंबरून वासराला चाटते जवा गाय)

कौतुकाची पाठीवर पडते जेव्हा थाप
तेव्हा मला त्याच्यामध्ये दिसतो माझा बाप

कष्ट घेतले त्याने आम्हा मोठ्ठ करताना
ओरडायचा शिस्तीसाठी उठता बसताना
ऑफिसात शिस्तीमुळे पडते जेव्हा छाप
तेव्हा मला त्याच्यामध्ये दिसतो माझा बाप

माझ्यापेक्षा बहिणेचे त्याला कौतुक
तिला कोणी बोललं तरी व्हायचा भावुक
ढसाढसा रडला जेव्हा ओलांडले माप
तेव्हा मला मापामध्ये दिसतो माझा बाप

आठवेल बाप तो ह्या जगात नसताना
कडकडून भेटा त्याला समोर दिसताना
चरणी ठेवा माथा त्याच्या धुवून जातील पाप
प्रत्येकाचा देव म्हणजे असतो त्याचा बाप

कौतुकाची पाठीवर पडते जेव्हा थाप
तेव्हा मला त्याच्यामध्ये दिसतो माझा बाप

Group content visibility: 
Use group defaults

सुंदर. थाप स्रिलिंगी आहे तेव्हा तिच्यामध्ये असे लिहा.
माप ओलांडताना बाप मुलीच्या घरी हजर असत नाही. हे लक्षात घ्या. बहुतेक वेळा बाप जिवंत असेपर्यंत त्याचे बापमुल्य लक्षात येत नाही. तो असेतो बरेच रूसवेफुगवे असतात पण गेल्यावर न भरुन येणारी पोकळी जाणवत राहते.

छानच आहे कविता.

तुषार खांबल -पुन्हा प्रकाशित करेन.
- इथेच तुमच्या मुळ कवितेवर जाउन सम्पादनावर क्लिक करा अन बदल सेव्ह करा....पुन्हा प्रकाशित करण्याची गरज नाही ना.