1978 माझे पहिले पोर्ट

Submitted by मीना उत्तरा on 24 June, 2019 - 07:18

1978 चे कात टाकत असलेले सिंगापूर

मर्चंट Navyतलं माझं पाहिलं foreign पोर्ट होतं सिंगापोर.
आजच्या singaporian पिढीला बघून कदाचित कोणालाही वाटत असेल की ते परंपरागत वेस्टर्न culture मध्येच अस्तित्वात होतं तर ते तसं नाहीये. 1978 ते 1980's मध्ये हा देश "third world to first world in a single generation" च्या transition मध्ये होता ते transition मला टप्प्याटप्प्यानी बघायला मिळालं !
शिख,तमिळ,काही ब्रिटिश वगळता अत्यंत shabbily dressed up, बेशिस्त आणि loose वागणाऱ्या काही communities चा हा देश होता. ( उदा..मले ,चिनी, व्हिएटनामिज, श्रीलंकन, बर्मिज , तैवानिज )
China town hawkers नी गजबजलेलं असायचं. लांब केसाचे इंडोनेशियन किंवा श्रीलंकन seamen आले की पोलीस त्यांना पकडुन haircut घ्यायला लावायचे.
आताच्या size पेक्षा 60 ते 65% लहान आकाराचे टॅक्स फ्री बेट होते हे.
बोटीवरचे अनेक देशांतील खलाशी व ऑफिसर्स तसेच विमानातले बरेच जणं, आणी विशेष म्हणजे मद्रासहुन येणारे मानवी mules हे सगळे technically तस्करी म्हणता येईल अशा अनेक प्रकारात गुंतलेले होते.
तरीसुद्धा सिंगापोर च्या कायद्यानुसार तो देश काहीच बेकायदेशीर करत नव्हता. पॅसेंजर शिपवर कॉलेजवयीन मुली unaccounted चढायच्या, अनेकविध धंदे करत आणि शॉपिंग करत चरितार्थ चालवायच्या. पुढे हा प्रकार accidently काही सरकारी मंडळींना समजला व त्यावर कडक कारवाई करत हा प्रकार थांबवण्यात यश मिळाले.
व्हिएतनाम वॉर मुळे अमेरिकन सैनिकही यायचे मनसोक्त मनोरंजनासाठी , ह्या सगळ्यातुन सिंगपोरला बाहेर काढून आजचं business hub चं स्वरूप देण्यात LKY (1st PM Lee Kuan Yew) ना प्रचंड यश आल.
पूर्वीचे मुस्ताफाचे होलसेल वर चालणारे सोने व इलेक्ट्रॉनिक चे दुकान, Tanjung Pagar, चायना टाऊन आणि peoples पार्क चा मॉल हे कायमच फार गजबजलेले असायचे...
त्यातच समुद्रातील बेशिस्त शिपसची गर्दी ,त्यांचे वारंवार होणारे किरकोळ अपघात....
अशा अनागोंदी पार्श्वभुमीवर singaporean मिलिटरी आणि पोलिस हे कंम्युनिस्टांची लाट मलेशीया मार्गे सिंगपोर मध्ये येणार तर नाही ना ह्यावर कडक नजर ठेवुन होते !
पुढे अत्यंत थोड्या काळात म्हणजेच वीसेक वर्षात सिंगपोरचा आकार वाढवला गेला समुद्रात प्रचंड भर घालून, मोठया प्रमाणात चीनी लोकांचं प्रमाण वाढवून (आता नाही ते येत इतकेच) , अतिशय कडक शिस्त आणि सतत सर्वत्र लक्ष ठेवुन हा असा छोट्या बेटाचा देश अतिशय पॉवरफुल देश बनला.
त्याकाळी माझ्यासारख्या प्रोफेशनल्स ना PM चं पत्रं यायचं की आमच्या देशात settle व्हायला या ! आता मात्र वर्क परमिट visa ही सहज नाही मिळत !
आज सर्व क्षेत्रात प्रगत समजला जाणारा हा अगदी छोटा देश पूर्वी भारताच्या चोला सम्राटांच्या व्यापारी गलबतांच्या प्रवासी टप्प्यावरील एक दलदलीचा प्रदेश होता... इंडोनेशिया तेंव्हा श्रीजय नावाने ओळखले जात होतं... पण पुढे भारतीयांचं लक्ष शिपपिंगमधून पूर्ण गेलं आणि तिकडचा भारतीय प्रभावही संपला !!
तर असं हे सिंगपोर, 1978 पासुन माझा खुपच संबंध असलेले व्यापारी बंदर .....त्या देशाच्या आजच्या वैभवापेक्षा मला त्याच्या ह्या अमुलाग्र बदलाचीच जास्त कमाल वाटते !!

Group content visibility: 
Use group defaults

छान आहे लेख. पण लेखमालेतील तिसरा भाग वाचूनही काही वाचल्यासारखे वाटले नाही.
दर्यावर्दी आयुष्याबद्दल वाचायची उत्सुकता असल्याने मला लेख त्रोटक आणि छोटा वाटला.

शाली+1
भाग अजुन मोठे हवेत.पुढचा वाचयला उत्सुक!

मला लेख छान वाटला. प्रत्येक लिखाण वेगळं असतं. हे लिखाण शॉर्ट अँड स्वीट आहे. असेच लेख लिहीत रहा. आती मोठे लेख खूप पडले आहेत पण थोडक्यात लिहून एवढे डिटेल्स माझ्या सारख्या बिझी प्रोफेशनल साठी अगदी योग्य आहेत.

मला अगोदर माहिती होते माबोवर कुणाला असलं विस्कळित आवडणार नाही. हरभऱ्याच्या झाडावर चढवण्याचं काम मला आवडतं. शार्यचीन पाठीराखा घेऊन अवतरल्या आहेत लेखिका.

नमस्कार jayantip,
आपल्या विचारांची आता किंव वाटते, लिहिणारी प्रत्येक व्यक्ती ही केवळ प्रसिद्धीसाठीच लिहिते, आपण कोणालाही हरबर्याच्या झाडावर चढवू शकतो वगैरे....
लाईकचा हव्यास वगैरे....41वर्षाचे समुद्रावर रहाणे काय असते,? निसर्गाच्या अंगाखांद्यावर बागडलेल्या व्यक्तीची व त्याच्या घरच्यांची मानसिकता कशी असते?हे फक्त रॅगिंग करण्याची मनोवृत्ती असलेल्या व्यक्तीला नाही समजणार.
नावानिशी आभार मानले नाही म्हणून अस्वस्थ होणारे तुम्ही खूपच उथळ पाण्यात उभे आहात.

आय वाज जस्ट जोकींग. पण हरभऱ्याच्या झाडावरून पडल्यावर फार दुखते हे ऐकून आहे. तूम्ही आपलं दुर्लक्ष करा. आणि लिहा छान पैकी.

नूरा रेसलिंग समाप्त. आता पहा ट्रोल ट्रोल करत खूप जण येतील लेखन आवडले सांगायला. सोशल मेडिया वरचं लिखाण लिहून गंगेला सोडलं असं मानायचे. लाईक नि कमेंट ची अपेक्षा करायची नसते, तर स्वानंदासाठी लिहावं हा तुमचा बाणा आवडला.
हा माझा शेवटचा प्रतिसाद..

काळजी नको, माझ्या वतीने कुणाला यायची गरज नाही, माझी मी समर्थ आहे, पण माझ्या मुळे तुम्हाला भरपूर प्रसिद्धी मिळत आहे, कारण माझ्या वाचक वर्गाचे वाचूनही झाले. ...

हो 1तासापूर्वी आलो आणि मायबोलीवर नविन लेख ह्या सदराखाली हा लेख आणि तुमचे ट्रॉलिंग हल्ले दोन्ही वाचले, तुम्ही स्वतः जे कोणी आहात तेही 1दिवसापूर्वीच दाखल झालेले दिसत आहात, आनंद आहे! तुमच्या अशा हल्ल्यांना त्या कंटाळुन थांबल्या नाहीत म्हणजे झाले ! तुकोबांनी तर म्हणलंच होतं किहो ....रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग .... शेवटी तुम्हीही त्याचिच निर्मिती ... बघुया आम्हाला चांगलं काही वाचण्यापासुन तुम्ही किती थांबवता आणि अजुन किती इतर लेखकांवर हल्ले करता ते ...!

नमस्कार उपाशी बोका
धन्यवाद प्रोत्साहना बद्दल. आपले नाव मजेशीर आहे, आवडले.

आर्यचीन व तुकाराम, नमस्कार,
आपण माझ्या वतीने वादविवादात पडू नये हि विनंती. आपण लेखनासाठी केलेला आग्रह पोचला. धन्यवाद

आर्यचीन व तुकाराम, नमस्कार,
आपण माझ्या वतीने वादविवादात पडू नये हि विनंती. आपण लेखनासाठी केलेला आग्रह पोचला. धन्यवाद

मस्त लेख. नवीन माहिती मिळाली. आजूबाजूला चालणार्या राड्याकडे दुर्लक्ष करून लेखमाला चालू ठेवावी ही विनंती. धन्यवाद.

छान, माहितीपूर्ण आणि (माझ्यासाठी तरी ) नाविन्यपूर्ण लेखन...
पुढील भागाच्या प्रतीक्षेत
शुभेच्छा!!

Pages