नवनाथ भक्तीसारामधील २ अध्यायाच्या फलश्रुती बद्दल माहिती हवी आहे

Submitted by स्मितस्वप्न on 24 June, 2019 - 04:21

नवनाथ भक्तीसारामधील २ अध्यायाचे सहा महिन्याचे पारायण करायचे आहे, तर त्या बाबतीत कोणी मार्गदर्शन करू शकेल का?

धन्यवाद

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

2 अध्यायाचे की दुसऱ्या अध्यायाचे?
मी म्हणेन अगोदर पारायण करा. व तुम्हाला काय अनुभव आलाय ते इथे लिहा.

जाणकार यावर विचार मांडतीलच. पण थोडे सुचवते की तुम्ही शेवटच्या अध्यायातील फलश्रुती वाचली आहे का. आणि पारायणाबाबत मार्गदर्शन नियम वगैरे पोथी च्या सुरुवातीलाच आहे ना.

मी अजून भक्तिसार पोथीचे पारायण चालू केले नाही, नियम पोथी मधून माहिती करून घेतले आहेत, पण चालू करायची इच्छा आहे,

कुठले २ अध्याय ? अध्याय क्रमांक काय?
तुम्हाला नेमके काय हवे आहे? फलश्रुती बद्दल माहिती हवी आहे की पारायण विधीबद्दल?
शीर्षक एक आहे आणि आत प्रश्न वेगळा आहे.

ग्रंथांच्या फलश्रुती सहसा त्या त्या अध्यायाच्या शेवटी किंवा पूर्ण ग्रंथाच्या शेवटी अवतरणिका / अखेरचा अध्याय असतो त्यात असते.

नवनाथ भक्तीसार असा गुगल सर्च दिल्यास पारायण फलश्रुती इत्यादि सर्व माहिती नेटवर उपलब्ध आहे असे दिसले. कृपया ती पण एकदा पहा.

Submitted by स्मितस्वप्न on 24 June, 2019 - 14:59 >>>>
यावरून असे वाटतेय की दिलेल्या फलश्रुतीप्रमाणे अनुभव येतात का / कोणाला आले आहेत का --- असा प्रश्न आहे तुमचा? तर थोडी वाट बघावी लागेल अशी सकाम पारायणे करून अनुभव आलेल्या व्यक्तींच्या प्रतिसादाची.

प्रश्न चुकला म्हणून सॉरी नको म्हणायला पण मग अपेक्षित उत्तरे येणार / मिळणार नाहीत ना....
मला अमुक कारणासाठी अमुक वाचायला सांगितले आहे / वाचायचे आहे, ही- ही माहिती मला आहे.
ही शंका मला आहे किंवा ही माहिती मला हवी आहे --- असे विचारले की मग लोक तेव्हढे सांगू शकतील. बाकी काही नाही.

http://navnathbhaktisar.org/parayan.php

या लिंकवर सर्व माहिती मिळेल.
दुसऱ्या अध्यायाची फलश्रुती म्हणजे अपार धनाची प्राप्ती होईल.

सकाम पारायणाला सुरवात करण्याआधी नवनाथ आणि गुरू दत्तात्रेयांना मनोभावे वंदन करून श्रद्धापूर्वक, केलेला संकल्प आणि कशासाठी पारायण करतो आहोत हे सांगा.
मनात कुठलीही शंका न ठेवता 'विश्वासानं' पारायण करा. नक्कीच अनुभव घ्याल. Happy
शुभेच्छा !

कलियुगात भौतिक लाभाची अपेक्षा ठेवून केलेली कर्म कांड, जप,पारायण याला फळ मिळत नाही, फक्त सहनशीलता वाढते व पात्रतेनुसार मन:शांती मिळते.