माझ्यापुरता मी

Submitted by राजेंद्र देवी on 23 June, 2019 - 12:19

माझ्यापुरता मी

ना चंदनापरी झिजलो मी
ना निरांजनाची वात मी
ना उदबत्तीचे भस्म मी
कापरा प्रमाणे जळालो मी

ना सुगंध फुलांचा मी
ना आवाज कोकीळेचा
ना कावळा मी पिंडाचा
साधा जन्म माणसाचा

गुंतलो ना कधी माणसात मी
ना कधी माझ्याच शब्दात मी
ना दिले कधी दान कुणा
माझ्यापुरता उदार कर्ण मी

राजेंद्र देवी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Chan