संगीत सत्ता सम्राट

Submitted by Asu on 20 June, 2019 - 23:40

संगीत सत्ता सम्राट
(लेवा गणबोली)

नांदी तं झकास झाली...
गनदेवता परसन्न झाली
गर्दी गैऱ्ही कशी झाली?
भल्याभल्यायची
दांडी उडाली…

नांदी तं झकास झाली...
नाटकाची आता कुढी
सुरवात झाली
गरीबायचा वाटे
आला वाली...
तिजोरी पन त्याची खाली!
आज उधार कालदी नगद
चालीन हे किती दिवस
झोई भरीसन गरीबाची
फेडतीन कंदी ते नवस?

नांदी तं झकास झाली...
नाटकबी मस्त व्हव्वा
गोड स्वर कानी पडवा
संगीताले सूर मियवा
आनखीन काय नको द्येवा
सगळ्यायले सुखी ठेवा!

प्रा. अरूण सु. पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

Group content visibility: 
Use group defaults