"शब्दकोडे"

Submitted by mi manasi on 20 June, 2019 - 22:44

मन माझे शब्दांचे कोडे
अजी मला जे उकललेची ना
अडीच अक्षरी प्रेमाच्या ते
गुंतून पडले कळलेही ना---- !!धृ

शब्द आडवा अमर येई तर
उभा येतसे प्रेम सदा
अलग कराया अमर प्रेम अन
मला कधीही रुचलेचि ना---- !!१

प्रेम दिवाना कधी मी नव्हतो
परि गेलो प्रेमाच्या गावा
सरता यात्रा कळून चुकले
प्रेम कुठेही वसलेची ना----- !!२

ठाऊक नव्हती घरे सुखाची
वेगळेच मी कॉलम भरले
खेळ संपता कळले मजला
अजुनी कोडे सुटलेची ना---- !!३
...... मी मानसी

Group content visibility: 
Public - accessible to all site users