श्रद्धांजली

Submitted by रोहितकुलकर्णी on 15 June, 2019 - 09:24

खूप काही दिलं जुन्या वहीने!

पाहिलं आभाळ...
माझ्या कवितेस मुक्त विहरण्यासाठी
पहिल्या सरीच्या पदराआड...
कोसळलेला शब्दांचा पाऊस
पहिला धीराचा हात...
कोलमडून पडलो होतो जेव्हा
पहिलं नवं कोरं क्षितिज...
फिनिक्स पक्षागत पंख उंचवायला
पहिलं असं बरचस काही आहे
...त्या जुन्या पानांच्या गर्दीमध्ये

नव्या वस्तुसुद्धा जून्या होतात...
...कदाचित विसरलो होतो मी
जेव्हा पूर्ण अस स्वतःच काहीच नव्हतं
तेव्हा घेत गेलो बापडा त्या वहीकडून
अन देताना सांडत गेलो शब्दांची रांगोळी...सहीसकट!

काळाच्या काठाने बरेचसे पाणी
पुलाखालून वाहून गेले आहे
मी सुद्धा कात टाकली आहे
लिहिण्यासाठी वहीच हवी
असा काही नेम नाही आता
पण जून्या वहीची शेवटची काही पाने
जाणीवपूर्वक कोरडी ठेवली आहेत
... श्रद्धांजली म्हणून!

- रोहित कुलकर्णी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजकालच्या कविता कविता म्हणून न राहता गदय लिखाणाच थोडंफार यमक जुळवून केलेलं रूपांतरण वाटतं.
असो, पुढील रूपांतरणाच्या प्रतीक्षेत!!

छान