प्रीती-निवास

Submitted by प्रांजलीप्रानम on 14 June, 2019 - 09:11

प्रीती-निवास
आठवणींच्या लकेरी अनेक
स्मरणी आहे तुच खास

सभोवती मदमस्त सुगंधात
दरवळतो आहे तुझाच श्वास

स्पंदन हृदयाची होतात
तु नसनसात आहे वाहतोस

वाऱ्याच्या मंद लहरीतही
होतो तूझ्याच स्पर्शाचा भास

अफाट विश्व दृष्टिठायी
परि स्वप्नात तुझीच आस

माझ्या या जीवनी तर
तुझाच एक गहिरा ध्यास

अंत:करणाच्या गाभाऱ्यात
तुच फुलवि प्रीती-निवास
....प्रांजली

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults