एकरूप

Submitted by राजेंद्र देवी on 13 June, 2019 - 22:46

एकरूप

येता महिना आषाढ
लागते विठ्ठलाची ओढ
सोबतीस रुक्मिणी गोड
महिमा त्यांचा अजोड

एक भोळा तो सावळा
गळा शोभती तुळसी माळा
वाळवंटी भरला मेळा
भक्तगण असे जगावेगळा

अबीर बुक्का कपाळा
कासे पितांबर शेला निळा
रूप पाहता लोचनी
दाटे कंठ, फुटे उमाळा

उभा विटेवरी युगानुयुगा
उद्धरू पाहे या कलियुगा
मी पामर, काय मी मागावे
तुझ्या पायरीशी एकरूप व्हावे

राजेंद्र देवी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर!
एक च्या ऐवजी देव बरं वाटेल का?
मला अजून इथे type करणं जमत नाही ..
copy-pest करते. म्हणून प्रतिक्रिया देता येत नाही .

एक रूप ह्या अर्थाने आणि एकरूप मिसळून जाणे या अर्थाने पण देवरूप आपणास नसते ते देवासच असावे .... प्रतिसादाबद्दल धन्यवाद

Grt