ठिणगी

Submitted by कांचन...शैली on 13 June, 2019 - 12:00

ठिणगी
ठिणगी पडली पाहिजे मनात,
जर तू पुरुष असशील,
वागायचं कसं? समजलं पाहिजे,तिच्याशी.
बघ की एकदा,.... घरदार सोडून.
एखाद्या च्या घरी ,आपलं म्हणून राहायचं,
कसं वाटतं ते?
प्रत्येक हाकेसरशी सरसावून यायचं,.…
ऊठण, बसणं, चहापाणी ,जेवणखान ,
धुणं भांडी ,,,, सगळंच मग आलं रे…..
तुझ्या सारखीच वाढलीय ती ,
लाडाकोडात, आरामात,...
कदाचित तुझ्याही पेक्षा ऐश्वर्या त,....
आलेय ती तुझ्यासाठी,
लक्षात घे जरा मनात ,...!
सारंच तिचं ऐक ...असं ...
मुळीच म्हणणं नाही....
पण वेड्या....
आपली बहिनच असती तर ;
......समजून तिची काळजी का घेत नाहीस?
बघ ,
खूप वेळ आहे विचार करायला ---
पण जरा लवकर ---
तू केलीस सुरुवात तर,....
कदाचित ...बरं ही पडेल
तुझ्या स्वतः च्या बहिणीला...!
ठिणगी पडली पाहिजे मनात ,
जर तू पुरूष असशील तर .
बस एवढंच!!!
---कांचन (शैली)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

Thanku.. ..Manya
आपल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद !!