पिकलं पान

Submitted by दत्तात्रय साळुंके on 12 June, 2019 - 12:40

पिकलं पान

(@ अश्विनी के यांचा आजच "झडलेले बाबा न पडलेली आई " या कवितेला आलेला प्रतिसाद वाचला आणि मी कधीतरी त्या प्रतिसादाला काहीशी सुसंगत अशी कविता आधीच लिहीली होती त्याची आठवण झाली. अश्विनी के धन्यवाद तुमच्यामुळे ती कविता प्रकाशित करण्याचे आठवले.)

पिकलं पान

झाडावर डोलतय हिरव पान
खेळात हरपली भूक तहान
बहराचा ऋतू उमदा सर्वदा
फांदी फांदीवर जीवन गान

स्वप्नांच्या झुल्यात ते झुलतय
किलबिल पाखरांशी बोलतय
फुलांना मस्तकी झेलतय
अन् फळांचे देठ सजवतय

फांदी मात्र निर्विकार योगी
वसंत, शिशीर सारखेच भोगी
पानं असलं काय नसलं काय
सोहळा जगायचा थांबत नाय

चाहूल लागली शिशीराची
वेळ भरली पिकल्या पानाची
आपलं नसतच केव्हा काही
उमगता मातीला मिळून जायी

रोजचा खेळ माणसा समोर
तरी का अंतक्षणी व्हावे विभोर
देतात पानंफुलं जगाला भरभरुन
अन् सोडतात फांदीला हसून

© दत्तात्रय साळुंके

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान