प्रवास

Submitted by Kajal mayekar on 10 June, 2019 - 07:28

लाकडी होडी
आजूबाजूस हिरवीगार झाडी
थंडगार नितळ पाणी
सोबतीस मधुर गाणी
सोबत तुझी साथ
मनी वाटे कधी संपू नये हि वाट..

Group content visibility: 
Use group defaults

सगळं छान. पण वाट शब्द खटकला. होडीतून प्रवास सुरू आहे मग . मार्ग शब्दही सुट झाला नसता म्हणा.
मनी वाटे कधी संपू नये या सर्वांची साथ..
चालीत म्हणायला मला यावरून ओळी सुचल्या.
ही होडी
हिरवी झाडी
निळे पाणी
गाऊ गाणी
तुझी जोडी
वाटे गोडी
....
( कृपया माझ्या आगावुपणाला माफ करा.)

सर्वप्रथम आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल धन्यवाद shaktiram. वाट म्हणजे exact वाट, रस्ता, मार्ग नाही तर तो आजूबाजूचा निसर्ग, सोबतीला प्रिय व्यक्तीची साथ ती अशीच राहू दे.. तो क्षण तसाच राहू दे.. काळाने पुढे सरकूच नये.. अस आहे म्हणून मनी वाटे कधी संपू नये हि वाट..

थोडी मोठी लिहिली असती तर चांगली कविता म्हणता आलं असतं.
हि ना धड चारोळी ना कविता अशी झालीये.
छान प्रयत्न!