सांग सांगते

Submitted by Asu on 6 June, 2019 - 22:53

सांग सांगते
(लेवा गणबोली)

सांग टोकराची हलकीफुलकी
वापऱ्याले लई आशे बहुगुनी
कुढीबी वापरा कशीबी वापरा
कोपऱ्यात बसते सुनी सुनी

वरती चढ्याले खाले उतऱ्याले
गच्ची पत्र्यावर आनं धाब्यावर
तुम्ही तंतर म्हना की यंतर म्हना
कमी शक्ति आनं काम भराभर

सांग सांगते तुले मानसा
चढ्याचं जर यश शिखर
कठीन येळी बिकट कायी
मार्ग नही तुले माह्या बिगर

जायाचं जर भरभर वरवर
माह्या बिगर नी खरा मैतर
सांग ईना ना तुही परगती
बोल आसु दे ध्यानी बरुबर

कदी उतार, कदी चढाव
दान आशे नशिबाच्या हाती
जीवन म्हनजे साप शिडी
खेय खेयने फकस्त हाती

पराजयाचा कदी साप गियी
कदी चढे यशाची उंच शिडी
जीवन जगने ऊन सावली
परीक्षा मानसाची घडोघडी

सांग सांगते मनुजा कितींदा
उभं राह्याचं चढोयण्या मरदा
सांग उभी परगती हरघडी
आडवी व्हता व्हते तिरडी

बयन्या पह्यले सोता चितेवर
सांग व्हई ती चढन्या सरर्गावर
सांग म्हने सदा उपकार करवा
नकयत चितेमधी बयुन जावा

प्रा. अरूण सु. पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults