सुवर्णकाळ

Submitted by प्रांजलीप्रानम on 5 June, 2019 - 07:04

(बालपणीचा सुट्टीचा काळ माझ्या बबलीच्या नजरेतून)
सुवर्णकाळ
खरचं किती छान होते ते दिवस
जेव्हा होतो छोटे
सापडणार नाही का पून्हा एकदा
हरवलेत ते कुठे?
लहान मोठे काहीच नव्हतं
एकच होऊन जायचो
नाँडी,किपर, विक्रम- वेताळ
स्वत: मध्ये पाहायचो,
खूप थकून जायचो
मजा मस्ती करून
पोटभर जेवायचो आम्ही
डाळ चपाती चूरून
साधी मूगडाळही
खरचं भारी लागायची
गोष्टी सांगण्यात- ऐकण्यात
सारी दुपार जागायची
अफलातून मैफिलही जमायची
आमची नाच गाण्याची
गरजच नव्हती खरचं
बाहेर कुठे ही जाण्याची
नाच 'खंडेरायाच्या लग्नाचा'
ताई छानच करायच्या
अधून मधून
छोट्या बबलीने
बाजूला उड्या मारायच्या
आता मग
पियानो- गिटारचही
कौतुक होतं सगळ्यांना भारी
आँर्केस्ट्राचा फिल
घराला यायचा
भन्नाट होती सारी
सहज झालेले जोक्स् आठवून
आताही खूप हसू येतं
नकळत मन आजही मला
त्या दिवसात नेतं
पून्हा तसचं लहान व्हावं,
सारखं सारखं वाटतं
तीच खरी मौज
जीवनातली ,
मनोमन पटतं.
..... प्रांजली.

Group content visibility: 
Use group defaults

Give Me Some Sunshine, Give Me Some Rain
Give Me Another Chance I Wanna Grow Up Once Again आठवलं..!

Thanks a lot.......
मन्या S
,पद्म,
DJ
डॉ. विक्रांत आपल्या सगळ्यांना
प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद!