माया!

Submitted by अज्ञातवासी on 4 June, 2019 - 17:09

अभेद्य त्या तटावर,
चिरा का पडती?
कधी वाळूचा कण न सोडता,
बुरुज का ढासळती?

बांधूनी स्वप्नांचे इमले,
उधळले स्वार!
स्वप्नातच कोसळला बंगला,
रंगला पत्यांचा डाव!

राजा राजेपण दाखवितो,
राणी तोरा मिरविसी!
विद्वजन चाली चालती,
विदूषक बाजी मारिती!

क्षणभंगुर आयुष्य,
का बुडबुडा आनंदाने फुलतो?
चिरंजीव अश्वत्थामा,
का मरणाची भीक मागतो?

खेळ कधी ना संपे,
निरंतर चालत राही!
खेळातून बाहेर पडता ,
मायेतच गुरफटून जाई!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुझ्या पहिल्या कवितेसाठी खुप खुप शुभेच्छा!
सुंदर लिहलंस... Happy Happy

सुंदर...

लिहा! लिहा! कविता लिहा, विज्ञान कथा लिहा, भयकथा लिहा, ललित कथा लिहा, कादंबऱ्या लिहा, चित्रपट परिक्षणे लिहा, राजकारणावर लिहा. एक प्रांत सोडू नका आम्हा गरीबांसाठी.
आम्ही बापडे लिहितो आता बाल वाङ्मय.
Lol Lol

छान!
Second last कडवे जास्त भावले
Well done! Keep it up.

लिहा! लिहा! कविता लिहा, विज्ञान कथा लिहा, भयकथा लिहा, ललित कथा लिहा, कादंबऱ्या लिहा, चित्रपट परिक्षणे लिहा, राजकारणावर लिहा. एक प्रांत सोडू नका आम्हा गरीबांसाठी.
आम्ही बापडे लिहितो आता बाल वाङ्मय. Shalida right ahat tumhi.... Hahaha... Konti Devi pavliy adnyala nkki