पण! (अनोखं प्रेम)

Submitted by प्रांजलीप्रानम on 23 May, 2019 - 15:09

पण! (अनोखं प्रेम)
हवे होते तूझ्याकडून
दोन शब्द आपूलकीचे
पण.......
तु झाला नाहीस
माझाही अन् पारखासुध्दा
जोडणार होते तूझ्याशीच फक्त
एक ते अबोल नातं
पण......
प्रेम करताच आले नाही
व्यक्तही अन् अव्यक्तसुध्दा
विसरायचे होते हे जग
बाहूपाशात येऊनी तूझ्या
पण......
तू जवळ नाही
आलास अन् दुरावलाससुध्दा
शोधत होते डोळ्यात तूझ्या
ओथंबलेले प्रेम माझे
पण......
तू कधीच नाही
दिलेस लक्ष अन् दूर्लक्षीलेससूध्दा
होती आस जोड़ देण्याची
क्षितीजापर्यंत तूला
पण......
तू सोबत नाही
चाललास अन् थांबलाससूध्दा
......प्रांजली.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान Happy

छान.
प्रेमाच्या कविता मला जरा जास्तच आवडतात.
पुलेशु

प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद!
अज्ञातवासी,मन्या,मन्या S, VB, भाग्यश्री १२३,
राजेंद्र देवी, मेघा, akki320
Thank you so much.

आवडली कविता...
विशेषतः भेद-अभेद असलेल्या कडव्यांतल्या शेवटच्या ओळी सुरेख लिहिल्यात....
....तुमच्याकडून प्रेरणादायी कविता लिखाणाचीही अपेक्षा आहे...
पुढील लेखणास शुभेच्छा!!

नक्कीच ,
पद्म ,प्रतिसादाबद्दल खूप धन्यवाद!