ह्रदयात माझ्या सांडला आहेस का

Submitted by सुप्रिया जाधव. on 21 May, 2019 - 03:19

निष्कर्ष भलता काढला आहेस का
चष्मा कुणाचा लावला आहेस का

मी गुंफते अजुनी तुला शेरांमधे
ह्रदयात माझ्या सांडला आहेस का

वस्त्रातुनी हा निसटला आहे खरा
तू तोच धागा ओढला आहेस का

आई-वडिल, नवरा-मुले आणिक सख्या
सल्ला स्वतःचा मानला आहेस का

वनवास माझा संपता संपेचना
राशीस माझ्या लागला आहेस का

असहाय्य जर होते तुला घुसमट तुझी
तू उंबरा ओलांडला आहेस का

सुप्रिया मिलिंद जाधव

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख जमली आहे.

असहाय्य जर घुसमट तुझी होते 'प्रिया'
तू उंबरा ओलांडला आहेस का ?>>>छान. बाकीचेही शेर छान आहेत.

हरकत नाही
तुमच्या पुढील गझल वाचनास शुभेच्छा !

धन्यवाद

निष्कर्ष भलताच असे केले तर म्हणण्यावर जोर येईल असे वाटते अर्थात मात्रात बसत असेल तर बाकी गझल नेहमी प्रमाणे उत्तमच ......

मस्त

छान!