जला शिवाय जीवन

Submitted by वैशाली अ वर्तक on 19 May, 2019 - 14:33

जला शिवाय जीवन 9/5/2019

पंच तत्वातील तत्व
"जल " एक तत्व असे
पाच तत्वांची गरज
मानवास सदा भासे

अन्न वस्त्र न् निवारा
जरी मूलभूत गरजा
जला शिवाय जीवन
शक्य नसेच समजा

विसंबून जलावरी
जल चर सारी सृष्टी
कसे पिकविन धान्य
पोशिंद्याचा जीव कष्टी

जलामुळे मिळे वीज
घडे औद्योगिक क्रांती
जला शिवाय जीवन
ख-या अर्थाने विश्रांती

थेंबे थेंबे तळे साचे
मोल जाणावे जलाचे
वसुंधरा भेगाळली
कसे होईल जगाचे

पाणी हे निसर्ग दत्त
तरी जाणा त्याचे मोल
जल जिरवा मातीत
राखू निसर्गाचा तोल

निसर्गाचा नसे कोप
मानवाचा अती लोभ
प्रगतीच्या नावाखाली
थांबवुया आता क्षोभ.

......वैशाली वर्तक.( अहमदाबाद )

Group content visibility: 
Use group defaults